शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे-बेलापूर रोडवर अपघातांची मालिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 02:42 IST

महापालिका व ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे ठाणे-बेलापूर रोडवर अपघातांची मालिका सुरू झाली आहे.

नामदेव मोरे नवी मुंबई : महापालिका व ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे ठाणे-बेलापूर रोडवर अपघातांची मालिका सुरू झाली आहे. तुर्भे ते दिघा दरम्यान आवश्यक त्या ठिकाणी सूचना फलक लावण्यात आलेले नाहीत. अपघातजन्य ठिकाणांची माहितीही देण्यात आलेली नाही. यामुळे रोज अपघात होवू लागले असून, मोठ्या प्रमाणात जीवित व वित्त हानी होवू लागली आहे.ठाणे-बेलापूर रोडवरून ऐरोलीच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरवरील (डीएन ०९ एन ९४५०) चालकाला घणसोलीजवळील उड्डाणपुलाचा अंदाज आला नाही. पुढे उड्डाणपूल असल्याच्या सूचनाही रोडवर कुठेच लावण्यात आल्या नव्हत्या. यामुळे कंटेनरने दुभाजकास धडक दिली. कंटेनर दुभाजकावरून १०० फूट पुढे गेला. या अपघातामध्ये चालकास किरकोळ दुखापत झाली आहे. कंटेनर पलटी झाला नसल्याने वाहतूककोंडी व जीवितहानी झाली नाही. घणसोली रेल्वे स्टेशनसमोरील हा पहिला अपघात नाही. एक महिन्यात तीन कंटेनरचे याच ठिकाणी अपघात झाले आहेत. एक कंटेनरच्या धडकेमुळे रोडला लागून असलेली संरक्षण भिंतही कोसळली आहे. अपघातामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडीही झाली होती. या ठिकाणी अपघात टाळण्यासाठी रंबलर्स बसविण्यात यावेत. १०० व २०० मीटर अंतरावर पुढे उड्डाणपूल असल्याचे सूचना फलक लावणे आवश्यक आहे. शिवाय एमएमआरडीएच्या भुयारी मार्गाचे काम सुरू असून त्याचा उल्लेखही असणे आवश्यक आहे. पण यापैकी काहीही सूचना नसल्यामुळे हा अपघात झाला. याठिकाणी रोज किमान एकतरी वाहनाचा अपघात होत आहे. पूर्ण ठाणे-बेलापूर रोडवर हीच स्थिती आहे. तुर्भे नाक्यावर या रोडची सुरुवात होते. महामार्ग संपल्यानंतर पुढे एपीएमसीच्या दिशेला जाण्यासाठी उड्डाणपूल आहे. वास्तविक ठाण्याकडे जाणारी वाहने पुलावरून न जाता डावीकडून पुढे जाणे अपेक्षित आहे. पण याविषयी सूचना फलक देण्यात आलेला नाही. यामुळे अनेक वाहने दुभाजकाला धडकत आहेत.तुर्भे स्टोअर्सवरून पुढे आल्यानंतर कोपरीकडे जाणारा उड्डाणपूल आहे. वाशी, एपीएमसीकडे जाणारी वाहने या पुलावरून जाणे अपेक्षित आहे. ठाण्याकडे जाणाºया वाहनांसाठी हा पूल नाही. पण याविषयी योग्य सूचना फलक योग्य अंतरावर लावण्यात आलेले नाहीत. यामुळे ठाणे-बेलापूर रोडवर उड्डाणपुलांच्या सुरुवातीला अपघात होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.>कोट्यवधी रुपये पाण्यातमहापालिकेने ठाणे-बेलापूर रोडच्या देखभाल दुरुस्तीचा ठेका दिला आहे. ठेकेदाराने वर्षभर रोडवर दुभाजकाजवळ परावर्तक पट्ट्या बसविणे, दुभाजकाची स्वच्छता ठेवून त्यांची रंगरंगोटी करणे, रोडवर आवश्यक त्या ठिकाणी सूचना फलक बसविणे आवश्यक आहे. पण ठेकेदार कामचुकारपणा करत असून पालिकेचे कोट्यवधी रुपये पाण्यात जात असून अपघातामुळे जीवित व वित्तहानी होत आहे.>रंबलर्स बसवाघणसोली रेल्वे स्टेशनबाहेर उड्डाणपुलाच्या कठड्याला धडकून वारंवार अपघात होत आहे. गत महिन्यात दोन वेळा कंटेनर पलटी झाल्याने प्रचंड वाहतूककोेंडी झाली होती. बुधवारी पहाटेही याच ठिकाणी कंटेनरचा अपघात झाला आहे. पुलाच्या १०० मीटर अंतरावर सूचना फलक व रंबलर्स बसविण्यात यावेत अशा सूचना वाहतूक पोलिसांनी महापालिकेला केल्या आहेत.>ठाणे-बेलापूर रोडवर पुरेसे सूचना फलक नाहीत. अपघात रोखण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी रंबलर्स बसविण्यात यावेत, परावर्तक पट्टे व सूचना फलक लावण्यात यावेत यासाठी महापालिकेकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला आहे.- नितीन पवार,पोलीस उपआयुक्त,वाहतूक