शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाळ्यात अपघातांची मालिका, एका महिन्यात दहा अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 02:45 IST

मुंबई-गोवा महामार्गावर कर्नाळा खिंडीत अपघातांची मालिका सुरू आहे. येथील वळणावर ट्रेलर व इतर अवजड वाहने पलटी होण्याच्या घटना घडत आहेत.

पनवेल - मुंबई-गोवा महामार्गावर कर्नाळा खिंडीत अपघातांची मालिका सुरू आहे. येथील वळणावर ट्रेलर व इतर अवजड वाहने पलटी होण्याच्या घटना घडत आहेत. एका महिन्यात दहा अपघात झाले असून दोघांना जीव गमवावा लागला असून १५ पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. या घटनांमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.महामार्गावर होणाऱ्या अपघाताविषयी चिंता व्यक्त केली जात आहे. गुरु वारी देखील या मार्गावर ट्रेलर उलटला. सुदैवाने या अपघातामध्ये जीवितहानी झाली नाही. खिंडीतील कमळतळे याठिकाणी मोठ्या प्रमाणात नागमोडी वळण देण्यात आले आहे. याठिकाणाहून जाताना वाहन चालकाचा तोल जाऊन अपघात होत आहेत. मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असून अवजड वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. कर्नाळा खिंडीत अवजड वाहनांचेच अपघात होत आहेत. या अपघातामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत आहे.२०१८ मध्ये या संपूर्ण मार्गावर सुमारे १५६ अपघातांची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. या अपघातात ४० जणांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यानंतर २०१९ मध्ये देखील अपघातांचा आकडा वाढतच चालला आहे. यामध्ये कर्नाळा खिंडीत होणाºया अपघातांची संख्या लक्षणीय आहे. कर्नाळा खिंडीत रस्त्याचे रुंदीकरण करताना वृक्षांची मोठी कत्तल करण्यात आली. त्यानंतर मोठी नागमोडी वळणे देऊन हा रस्ता तयार करण्यात आला. विशेष म्हणजे अतिवेगाने याठिकाणाहून वाहने जात असतात. वळणाचा अंदाज येत नसल्याने वारंवार अपघाताचे प्रकार घडत आहेत. या ठिकाणी नागमोडी वळण देताना वळण कमी करण्याची गरज होती.मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम अद्याप सुरू आहे. ते पूर्ण झालेले नाही. शासनाने दिलेली १६ जून २०१९ ची डेडलाइन देखील पुढे गेली असल्याने महामार्गाचे काम पूर्ण कधी होणार? असा प्रश्न सध्याच्या घडीला विचारला जात आहे. रुंदीकरण करताना या रोडवरील अपघात कमी करण्यासाठीही ठोस उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.ग्रामस्थांचीही होत आहे गैरसोयमहामार्गाच्या दोन्ही बाजूला गावे आहेत. या गावांसाठी सर्व्हिस रोड, भुयारी मार्ग व इतर प्रस्तावित आहे. गावांमधील नागरिकांना महामार्ग ओलांडण्यासाठी योग्य सुविधा नाही. यामुळे रोडवरूनच रस्ता ओलांडावा लागत असून त्यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे.कर्नाळा खिंडीत नागमोडी वळण असल्यामुळे वारंवार अपघात होत आहेत. पावसाळ्यात अपघातांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. यासंदर्भात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला पत्र पाठवून संबंधित नागमोडी वळण कमी करण्याची विनंती केली आहे.- अशोक नाईक, वरिष्ठ पोलीस निरीक्षक,नवीन पनवेल वाहतूक शाखा

टॅग्स :Raigadरायगड