शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
2
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
3
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
4
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
5
आता एका क्लिकवर मिळेल उमेदवारांची संपत्ती आणि गुन्हेगारी रेकॉर्ड; 'हे' ४ ॲप्स लॉन्च!
6
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
7
सरन्यायाधीश गवईंवर बूट फेकण्याचा प्रयत्न करणारा वकील कोण? कशामुळे हे घडलं?
8
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
9
'तुम्ही इतके दिवस कुठे होतात'; मुलांसह लेणीत राहणाऱ्या रशियन महिलेच्या पतीला सर्वोच्च न्यायालयाने झापले
10
ऐकावं ते नवलच! नवरदेवाने हुंडा स्वीकारण्यास दिला नकार, सासऱ्याने मोडलं लग्न; नेमकं काय घडलं?
11
रिलेशनशिपची चर्चा, यशस्वीची ती कथित गर्लफ्रेंड कोण? नात्याबाबत केला मोठा गौप्यस्फोट
12
SIP की RD? दरमहा गुंतवणूक कुठे करावी? तज्ज्ञांच्या मते 'हा' आहे मोठा फरक, निर्णयापूर्वी वाचा महत्त्वाचे मुद्दे
13
'जेव्हा तू खराब फॉर्मशी झुंजशील, तेव्हा..." धोनीनं दिलेला कानमंत्र सिराजसाठी ठरतोय करिअरचा यु-टर्न
14
VIDEO: अमेरिकन बुद्धिबळपटूनं भारताच्या डी. गुकेशच्या 'राजा'ला प्रेक्षकांमध्ये का फेकलं?
15
"मनोज जरांगे पाटील यांनी राहुल गांधींबद्दल वापरलेली भाषा निषेधार्ह, त्यांच्या वक्तव्यांना राजकीय वास’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया   
16
"देशात पेरलं जाणारं विष आता...'; सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता
17
आयटी, फार्मा आणि बँकिंग क्षेत्रात तेजी! निफ्टी २५,००० च्या पुढे; गुंतवणूकदारांनी कमावले २.०१ लाख कोटी
18
नवा ट्रेंड! मूल नको, पण कुत्रा-मांजर हवं; मुलांची जागा घेतली प्राण्यांनी, देशात का वाढतंय पेट पॅरेंटिंग?
19
“१९९४ला आमच्या हक्काचे १६ टक्के शरद पवारांनी ओबीसींना दिले, आमचे वाटोळे केले”: मनोज जरांगे
20
’प्रस्तावाची वाट कसली पाहता, अमित शाहांच्या दौऱ्याआधीच शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर करायला हवे होते’, काँग्रेसचा टोला   

वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

By admin | Updated: May 13, 2017 01:17 IST

कार्यकाळ पूर्ण झाल्याने चार वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची इतरत्र बदली करण्यात आली आहे, तर बदलीवर आलेल्या नव्या पोलीस निरीक्षकांची विविध पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : कार्यकाळ पूर्ण झाल्याने चार वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची इतरत्र बदली करण्यात आली आहे, तर बदलीवर आलेल्या नव्या पोलीस निरीक्षकांची विविध पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे. पोलीस आयुक्तालयाअंतर्गत पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये चार वरिष्ठ निरीक्षकांचा सध्याच्या ठिकाणचा कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे इतरत्र बदली करण्यात आली आहे. तर बदलीवर आलेल्या नव्या पोलीस निरिक्षकांची आवश्यकता असलेल्या पोलीस ठाण्यात नेमणूक करण्यात आली आहे. बदली झालेल्या वरिष्ठ निरीक्षकांमध्ये कोपरखैरणेचे वरिष्ठ निरीक्षक सतीश गायकवाड, सीबीडी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक मीरा बनसोडे, महिला सहाय्यता कक्षाच्या वरिष्ठ निरीक्षक संगीता अल्फांसो-शिंदे व प्रशासन विभागाचे वरिष्ठ निरीक्षक संदिपान शिंदे यांचा समावेश आहे. गायकवाड यांची कोपरखैरणेतून वाशी वाहतूक शाखेच्या वरिष्ठ निरीक्षकपदी बदली करण्यात आली आहे. तर बदली होवून आलेले भरत कांबळे यांच्याकडे कोपरखैरणे पोलीस ठाण्याचा पदभार देण्यात आला आहे. संदिपान शिंदे यांच्याकडे अधिकराव पोळ यांच्या बदलीनंतर रिक्त असलेल्या गुन्हे शाखा कक्ष १ च्या वरिष्ठ निरीक्षकपदाचा कार्यभार देण्यात आला आहे. तर अल्फांसो यांची सीबीडी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकपदी व त्यांच्या जागी बनसोडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याशिवाय सीबीडी वाहतूक शाखेच्या वरिष्ठ निरीक्षक ममता डिसोजा यांची रबाळे वाहतूक शाखा व त्यांच्या जागी अभिजित मोहिते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वाशी पोलीस ठाण्याचे निरीक्षक चेतन काकडे यांची न्हावाशेवा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकपदी तर शहाजी जाधव यांची एनआरआय पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकपदी नेमणूक करण्यात आली आहे. तर स्मिता जाधव यांची अमली पदार्थ विरोधी पथकामध्ये नेमणूक करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे बदलीवर आलेल्या निरीक्षकांपैकी नितीन गीते व किसन गायकवाड वाशी, बापूराव देशमुख यांची कामोठे, अर्जुन गरड यांची सानपाडा, दत्तात्रय किंद्र यांची न्हावाशेवा, मोहन पाटील यांची सीबीडी, शशिकांत विश्वकार यांची पनवेल शहर पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे.