शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ नागरिक भार नसून देशाची संपत्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2018 03:49 IST

सशक्त समाजासाठी एकत्र कुटुंब पद्धती अतिशय महत्त्वाची असून ती नष्ट होता कामा नये.

नवी मुंबई : ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न अनेक आहेत. त्यांना सुविधा कमी मिळाल्या तरी चालतील; पण त्यांना खरी गरज आधाराची आहे. कारण, ज्येष्ठ नागरिक हे भार नसून ते देशाची संपत्ती आहेत. त्या अनुषंगाने त्यांना जपले पाहिजे, असे प्रतिपादन महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी केले.‘लोकमत’ आणि श्री गोवर्धनी सामाजिक सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने कर्तृत्ववान ज्येष्ठ नागरिकांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात रंगलेल्या या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. रामास्वामी एन. उपस्थित होते. या वेळी सिडकोचे माजी व्यवस्थापकीय संचालक जी. एस. गील, माजी पोलीस आयुक्त रामराव वाघ, हास्य कवी अशोक नायगावकर, कार्यक्रमाच्या निमंत्रिका आमदार मंदा म्हात्रे आणि ‘लोकमत’चे कार्यकारी संपादक विनायक पात्रुडकर, अखिल भारतीय ज्येष्ठ नागरिक संघटनेचे चापके उपस्थित होते.सशक्त समाजासाठी एकत्र कुटुंब पद्धती अतिशय महत्त्वाची असून ती नष्ट होता कामा नये. कारण संयुक्त कुटुंब पद्धतीत ज्येष्ठांना मानाचे स्थान असते. शासनाच्या कितीही महत्त्वाच्या योजना असल्या तरीदेखील त्या मूळ लाभार्थ्यापर्यंत पोहोचणे अतिशय महत्त्वाचे आहे. नवी मुंबईत तीन नवीन विरंगुळा केंद्र सुरू करण्यात येत असून, यामध्ये सर्व प्रकारच्या सोयी-सुविधा उपलब्ध करण्यात आल्याची माहिती आयुक्त रामास्वामी एन. यांनी या वेळी दिली.या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ११ ज्येष्ठ नागरिकांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. तसेच १६ ज्येष्ठ नागरिक संघाचाही विशेष पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाला शहरातील बहुतांशी ज्येष्ठ नागरिक संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. आमदार मंदा म्हात्रे यांनी आपल्या मनोगतातून ज्येष्ठ नागरिकांविषयी आपली तळमळ व्यक्त केली. येत्या काळात या घटकांसाठीच अधिक काम करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.ज्येष्ठांनी स्वत:ला कधीच एकटे समजू नका, असा मोलाचा सल्ला देतानाच प्रत्येक अडचणीत त्यांच्या सोबत राहण्याची ग्वाही, या व्यासपीठावरून दिली. लवकरच नेरुळ येथील गणपतशेठ तांडेल मैदानावर ज्येष्ठांकरिता एक सांस्कृतिक कार्यक्रम घेतला जाणार आहे. या कार्यक्रमाला जवळपास पाच हजार ज्येष्ठ नागरिक उपस्थित राहतील. यात ज्येष्ठ नागरिक आपल्या कलागुणांचे सादरीकरण करतील, असेही मंदा म्हात्रे यांनी या वेळी स्पष्ट केले. तर ज्येष्ठ नागरिक हा समाजातील अतिशय संवेदनशील घटक आहे. त्यांच्यात इच्छामरणाची बळावत चालली प्रवृत्ती चिंताजनक आहे. देशाचा खरा विकास साधायचा असेल, तर या घटकाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, असे ‘लोकमत’चे कार्यकारी संपादक विनायक पात्रुडकर यांनी या वेळी स्पष्ट केले.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई