शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

महागाई विरोधात सेनेचा मोर्चा, नरेंद्र मोदी यांच्याविरोधात घोषणाबाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 03:47 IST

वाढत्या महागाई विरोधात भाजपा सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निषेध करण्यासाठी पनवेलमध्ये गुरुवारी शिवसेनेच्या पदाधिका-यांनी मोर्चा काढत शहरात निषेध रॅली काढली.

पनवेल : वाढत्या महागाई विरोधात भाजपा सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निषेध करण्यासाठी पनवेलमध्ये गुरुवारी शिवसेनेच्या पदाधिका-यांनी मोर्चा काढत शहरात निषेध रॅली काढली. या मोर्चाला सेनेचे शेकडो पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. जिल्हाप्रमुख आमदार मनोहर भोईर यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा येथील तहसील कार्यालयावर काढण्यात आला होता.सध्याच्या घडीला महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पेट्रोल- डिझेलचे भाव गगनाला भिडले आहेत, गॅस सिलिंडर, डाळ तसेच रोजच्या वापरातील जीवनाश्यक वस्तूचे भाव दिवसेंदिवस वाढत आहेत. मोदी सरकार महागाई आटोक्यात आणण्यात अयशस्वी ठरत असल्याने केंद्रात व राज्यात भाजपासोबत सत्तेत असलेल्या सेनेनेच भाजपाविरोधात मोर्चा काढला आहे. मुंबईत या मोर्चाना सुरुवात झाली होती. या वेळी भाजपावर जोरदार टीकास्त्र सोडण्यात आले. काँग्रेसच्या काळात २०१३मध्ये गॅस सिलिंडरची किंमत ३५० आणि मोदी सरकारच्या काळात गॅस सिलिंडरची किंमत ७०० अशा प्रकारचे फलक झळकविण्यात येत होते. जिल्हाप्रमुख आ. मनोहर भोईर यांनी वाढत्या महागाईविरोधात सर्वसामान्यांना मोठी नाराजी असल्याचे सांगितले. जिल्हा सल्लागार बबन पाटील, उपजिल्हाप्रमुख शिरीष घरत, रामदास पाटील, परेश पाटील, गुरु नाथ पाटील, रामचंद्र देवरे, आत्माराम गावंड, अरविंद कडव, प्रथमेश सोमण आदींसह मोठ्या प्रमाणात शिवसैनिक व महिला आघाडीच्या पदाधिकारी उपस्थित होत्या.