शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जप्त केलेली वाहने ठरताहेत डोकेदुखी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 02:50 IST

विविध कारवायांमध्ये जप्त केलेली वाहने ठेवण्यासाठी जागा नसल्याने पोलिसांसह आरटीओपुढे जागेचा प्रश्न उभा राहिला आहे.

- सूर्यकांत वाघमारे नवी मुंबई- विविध कारवायांमध्ये जप्त केलेली वाहने ठेवण्यासाठी जागा नसल्याने पोलिसांसह आरटीओपुढे जागेचा प्रश्न उभा राहिला आहे. सद्य:स्थितीला अशी वाहने पोलीस ठाण्याभोवती अथवा रस्त्यालगत ठेवली जात आहेत. परंतु कायदेशीर प्रक्रिया वेळेत पूर्ण करून ताबा घेतला जात नसल्याने वर्षानुवर्षे पडून राहिलेली बहुतांश वाहने भंगार बनली असून पोलिसांना त्याची राखण करावी लागत आहे.अपघातग्रस्त अथवा गुन्ह्यात वापरलेली किंवा बेवारस स्थितीमध्ये उभी असलेली वाहने आरटीओ, वाहतूक तसेच शहर पोलिसांकडून जप्त केली जातात. अशा वाहनांमध्ये ट्रक, कार यांसह दुचाकी व रिक्षांचा सर्वाधिक समावेश आहे. ही वाहने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर पोलिसांकडून संबंधितांच्या ताब्यात दिली जातात. अथवा न्यायालयाच्या निदेशानुसार त्यांचा लिलाव केला जातो. परंतु अनेकदा जप्तीची वाहने सोडविण्याचा प्रयत्नदेखील संबंधितांकडून होत नाही. अशी वाहने पोलीस ठाण्याच्या आवारात वर्षानुवर्षे पडून राहतात. त्यामुळे प्रत्येक पोलीस ठाण्याच्या आवारात जप्तीच्या वाहनांचा खच पाहायला मिळत आहे. तर आरटीओकडून जप्त करण्यात आलेल्या वाहनांचा ढीग एपीएमसीतल्या चाचणी मैदानाच्या एका भागात साचला आहे. ज्या पोलीस ठाण्याभोेवती जराही जागा शिल्लक नाही, पर्यायाने अशी वाहने रस्त्यालगत अथवा परिसरातल्या मोकळ्या भूखंडावर साठवली जातात. शहरात अशी शेकडो वाहने उघड्यावर धूळ खात पडून राहिल्याने झीज होऊन भंगार झाली आहेत. त्यानंतरही केवळ कायदेशीर प्रक्रियेअभावी पोलिसांना या भंगाराचीदेखील राखण करावी लागत आहे.जप्तीची वाहने साठवण्यासाठी आरटीओसह पोलिसांकडे पुरेशी जागा नाही. यामुळे त्यांना केवळ जप्तीची वाहने साठवण्यासाठी स्वतंत्र जागेची आवश्यकता भासत आहे. कायदेशीर प्रक्रियेपूर्वी जप्तीतले वाहन गहाळ झाल्यास संबंधित अधिकाºयाला न्यायालयाची चपराक बसू शकते. यामुळे भंगार झाले तरीही पोलिसांकडून त्याची जपवणूक होत आहे. मुळात ठरावीक कालावधीनंतरही जप्तीच्या वाहनांचा संबंधिताने ताबा घेतला नाही, तर ती सुस्थितीत असतानाच लिलावात काढणे आवश्यक आहे. असे झाले तरच त्यापासून शासनाला पुरेसा मोबदला मिळू शकतो. परंतु वर्षानुवर्षे ती पडून राहिल्यानंतर त्यांचा भगार म्हणून कवडीमोल भावाने लिलाव केला जातो. कायद्याच्या प्रक्रियेतील अशा दिरंगाईमुळे शहरातील सर्वच पोलीस ठाण्यांच्या आवारात भंगाराचे ढीग साचले आहेत. याचा परिणाम परिसराच्या स्वच्छतेवरदेखील होत आहे.>रिक्षांची संख्या अधिकआरटीओकडून जप्त केल्या जाणाºया वाहनांमध्ये रिक्षांचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो. ठरावीक कालावधीनंतर अशा रिक्षांचादेखील लिलाव केला जातो. अशावेळी एका शहरात खरेदी केलेल्या भंगार रिक्षांची डागडुजी करून दुसºया शहरात वापरल्या जातात. शहरात रस्त्यावर धावणाºया बोगस रिक्षांमध्येअशाच भंगार रिक्षांचा समावेश आहे.