शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्यासमोरच त्याने तिघांना मारलंय"; वाल्मिक कराडच्या जुन्या सहकाऱ्याचा धक्कादायक दावा; म्हणाले, "त्याला बीडचा..."
2
...तर अशी भागणार पाकिस्तानची तहान; सिंधू जल करार रद्द केल्यानंतर शहबाज शरीफ मोठं पाऊल उचलणार!
3
“उद्धव ठाकरे ‘मातोश्री’चा एक हिस्सा काढून राज ठाकरेंना देणार का?”; नारायण राणेंचा सवाल
4
५ जुलैच्या ठाकरे बंधूंच्या विजयी सभेत सहभागी होणार का? काँग्रेस नेत्यांचे सूचक विधान, म्हणाले...
5
KL राहुलला विश्वासच बसेना! क्रिस वोक्सनं अप्रतिम चेंडूवर उडवला त्रिफळा (VIDEO)
6
राहुल आणि सोनिया गांधींनी केलेला २००० कोटी रुपये लाटण्याचा प्रयत्न; ईडीचा मोठा आरोप
7
भयंकर! कुत्रा चावल्यामुळे कबड्डीपटूचा तडफडून मृत्यू; अँटी रेबीज इंजेक्शन न घेणं बेतलं जीवावर
8
लग्नाआधीच अनेकदा तुझ्या रूममध्ये का दिसायची रितिका? भज्जीच्या प्रश्नावर रोहित शर्माचं भन्नाट उत्तर
9
कोलकाता: 'तो' बलात्कार होता तर आरोपीच्या अंगावर 'लव्ह बाईट्स' कसे? वकिलाचा धक्कादायक सवाल
10
काय वाटले असेल...? एनआयटी टॉपरला ४५ लाखांचे पॅकेज मिळाले अन् अचानक नोकरीवरून काढले...
11
Pitru Paksha 2025: यंदा पितृपक्षावर दोन ग्रहणांचे सावट; श्राद्धविधीत होणार अडचण? 
12
३ कोटी २० लाख सरकारी निधी हडपण्याचा डाव उघड; आमदार प्रसाद लाड यांचा खळबळजनक आरोप
13
अवघी दिल्ली एवढी लोकसंख्या, तरीही भारताच्या दृष्टीने 'घाना' देश महत्त्वाचा! कारण तरी काय?
14
सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीची चमकही झाली कमी; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवी किंमत
15
पवार काका-पुतण्यांना दे धक्का; NCP च्या दोन्ही गटातील दिग्गज नेत्यांचा भाजपामध्ये प्रवेश
16
Apoorva Mukhija : "मी सिंगल आहे, मला आता लग्न करायचंय; बॉयफ्रेंड शोधतेय, प्लीज कोणीतरी..."
17
Viral Video : हत्तीचं पिल्लू इवल्याशा बेडकाला घाबरलं; क्यूटनेस व्हिडीओनं नेटकऱ्यांचं मन जिंकलं!
18
जे कुणाला जमलं नाही ते टीम इंडियानं करून दाखवलं; इंग्लंडच्या मैदानात रचला इतिहास
19
कशापाई तू वारी हट्ट केलास रे बाळा.. आता मी घरी एकटीच जाऊ का; गोविंदासाठी आजीने फोडला हंबरडा
20
Chanakyaniti: चाणक्यनीतीनुसार तरुणपणी केलेल्या 'या' तीन चुका म्हातारपणी भोवतात!

सेंट्रल पार्कच्या दुसऱ्या टप्प्याला लवकरच सुरुवात

By admin | Updated: January 29, 2017 02:30 IST

खारघरमधील सेंट्रल पार्कच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामाला लवकरच सुरु वात होणार आहे. लंडनच्या हाईड पार्कच्या धर्तीवर उभारलेले सेंट्रल पार्क हे सर्वांच्याच आकर्षणाचे

- वैभव गायकर, पनवेलखारघरमधील सेंट्रल पार्कच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामाला लवकरच सुरु वात होणार आहे. लंडनच्या हाईड पार्कच्या धर्तीवर उभारलेले सेंट्रल पार्क हे सर्वांच्याच आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले आहे. सिडकोने २०१० साली तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन केले आहे. सेक्टर २३ पहिला टप्पा व सेक्टर २४, २५ मध्ये दुसरा टप्पा असे या प्रकल्पाचे स्वरूप आहे. सुमारे २०० एकर परिसरात नियोजित असलेल्या या प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला लवकरच सुरु वात होणार आहे. याकरिता टेंडर प्रक्रि येची तयारी सिडकोने पूर्ण केली आहे. सेंट्रल पार्कच्या पहिल्या टप्प्यात चिल्ड्रन पार्क, अ‍ॅम्पीथिएटर, हरित क्षेत्र, म्युझिकल इन्स्ट्रुमेंट पार्क, हस्त मुद्रा पार्क, थीम पार्क, फूड प्लाझा, वाहनतळ आदींचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या या प्रकल्पाला पाहण्यासाठी नवी मुंबई, मुंबई परिसरातील पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात, तसेच विशेष म्हणजे अनेक शालेय सहलींचे देखील याठिकाणी आयोजन केले जाते. २०० एकरपैकी जवळजवळ १०० एकर परिसरात या प्रकल्पाचा पहिला टप्पा आहे. याठिकाणी प्रवेश देखील विनामूल्य असल्याने सतत नागरिकांची वर्दळ याठिकाणी असते. सुमारे १०० कोटी रु पये खर्चून हा प्रकल्प उभारण्यात आले आहे. लवकरच सिडकोच्या वतीने नवी मुंबई विमानतळाच्या कामाला सुरु वात केली जाणार आहे. त्यापूर्वी सिडकोने उभारलेले हे आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या प्रकल्पापैकी एक असा प्रकल्प आहे. लवकरच दुसऱ्या टप्प्याच्या कामाला सुरु वात होणार आहे. त्या दुसऱ्या टप्प्यात म्युझिकल फाऊंटेन, अ‍ॅम्युझमेंट पार्क, किराइड्स, फ्लाइंग स्कूटर, वॉटर स्लाईड्स, वाईल्ड माऊस, रिवर, रिटेल शॉप, रेस्टॉरंट , गो कार्टिंग आदींचा समावेश आहे. या संपूर्ण प्रकल्पाच्या उभारणीला ४०० कोटी रुपये खर्च येणार आहे. पहिल्या टप्प्यातील चिल्ड्रन पार्क, अ‍ॅम्पी थिएटर, म्युझिकल इन्स्ट्र्युमेंट पार्क हे आकर्षक असे ठिकाण आहे. याठिकाणी साडेसहा हजार जण एकत्र बसतील एवढी जागा आहे. याठिकाणी योग तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. याकरिता एप्रिल महिन्यापर्यंत टेंडर काढण्यात येणार आहे. १८ हेक्टरपर्यंत अ‍ॅम्युझमेंट पार्क डेव्हलप केलेल्या व १०० कोटीपर्यंत कामे घेतलेल्या कंत्राटदार कंपनीला या दुसऱ्या टप्प्याच्या टेंडरमध्ये सहभाग घेता येणार आहे. दोन वर्षात हा टप्पा पूर्ण करण्याची मुदत असणार आहे. यावेळी अंदाजित ४०० कोटी खर्च येणार असल्याची माहिती सेंंट्रल पार्कचे कार्यकारी अधिकारी रामेश्वर कुसाळकर यांनी दिली.