शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील २६ थकबाकीदारांच्या मालमत्ता सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 02:46 IST

मालमत्ता कर थकबाकीदारांविरोधात पालिकेने कडक भूमिका घेतली आहे. शहरातील २६ जणांकडे एकूण ४ कोटी ४१ लाख रुपयांची थकबाकी असून त्यांच्या मालमत्ता सील करण्यात आल्या आहेत.

नवी मुंबई : मालमत्ता कर थकबाकीदारांविरोधात पालिकेने कडक भूमिका घेतली आहे. शहरातील २६ जणांकडे एकूण ४ कोटी ४१ लाख रुपयांची थकबाकी असून त्यांच्या मालमत्ता सील करण्यात आल्या आहेत.मालमत्ता कर हा नवी मुंबई महापालिकेचा उत्पन्नाचा प्रमुख स्रोत आहे. या विभागातील थकबाकीचे प्रमाण १ हजार कोटीपेक्षा जास्त झाले आहे. आयुक्त रामास्वामी एन. यांनी थकीत रक्कम वसूल करण्याच्या सूचना विभागप्रमुखांना दिल्या आहेत. मुख्य लेखा व वित्त अधिकारी धनराज गरड यांच्या मार्गदर्शनाखाली वसुलीसाठी विशेष मोहीम सुरू केली आहे. थकबाकीदारांच्या दुकान, हॉटेल व कार्यालयाबाहेर ढोल-ताशे वाजविण्यास सुरवात केली आहे. याशिवाय प्रत्येक थकबाकीदाराला वसुलीसाठी नोटीस पाठविली जात आहे. ४ कोटी ४१ लाख ६८ हजार ४७५ रुपयांची थकबाकी वसूल करण्यासाठी २६ मालमत्ताधारकांना नोटीस बजावण्यात आली होती. वारंवार नोटीस देऊनही कर भरणा न केल्यामुळे त्यांची मालमत्ता सील करण्यास सुरवात केली आहे. बेलापूर सेक्टर १५ मधील युनिट क्रमांक ११३ ते ११७ ही मोतीराम तोलाराम यांची मालमत्ता, नेरूळ सेक्टर ४६ ए मधील गेहलोत कन्स्ट्रक्शन, सेक्टर ४२ ए मधील पाम टॉवर सोसायटी, सेक्टर २८ मधील शांताराम बामा म्हात्रे, वाशी गाव येथील मिठा इस्टेटची दोन युनिट्स, वाशी सेक्टर २ मधील मिस्त्री इन्व्हेस्टमेंट मेघराज अँड मेघदूत, महाराष्ट्र राज्य माथाडी मंडळ, वाशी सेक्टर २४ मधील जेरी वर्गिस, सानपाडा सेक्टर ३ मधील किरण सोसायटी, घणसोली सेक्टर ४ मधील घनश्याम इंटरप्रायजेस, घणसोली येथील जॉय वर्गिस परूबली, ऐरोली सेक्टर १० मधील हसमुल्ला शेख, सेक्टर २० मधील देवजी पटेल, अभिराज बिल्डर्स, एकनाथ पाटील, जनार्दन मढवी, ऐरोलीमधील गुडवील डेव्हलपर्स यांच्या मालमत्तांवर कारवाई करण्यात आली आहे.कारवाई केलेल्या सर्वांना थकीत रक्कम भरण्यासाठी पुरेशी नोटीस दिली होती. कर न भरल्यास मालमत्ता सील करण्याचा इशारा देऊनही काहीच कार्यवाही केली नसल्याने त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. शहरातील इतर थकबाकीदारांवरही टप्प्याटप्प्याने अशाचप्रकारे कारवाई केली जाणार आहे. सर्व थकबाकीदारांनी वेळेत त्यांची थकीत रक्कम भरावी, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे. नोटीस देऊनही कर भरला नाही तर संबंधितांवर कारवाई केलीच जाईल असे स्पष्ट केले आहे.