शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

परराज्यांतून येतोय निकृष्ट औषधसाठा

By admin | Updated: January 25, 2015 01:15 IST

महाराष्ट्रातील औषधी दुकानांमध्ये अन्य राज्यांतून मोठ्या प्रमाणावर दर्जाहीन औषधी येत असल्याची बाब उघडकीस आली आहे.

श्रीनारायण तिवारी -मुंबई महाराष्ट्रातील औषधी दुकानांमध्ये अन्य राज्यांतून मोठ्या प्रमाणावर दर्जाहीन औषधी येत असल्याची बाब उघडकीस आली आहे. परराज्यांतून आलेल्या औषधांपैकी सुमारे १२.२६ टक्के साठा ‘दर्जाहीन’ असल्याचे आढळून आले आहे. यामुळे आरोग्य विभाग आणि अन्न व औषध प्रशासन विभागासमोर नवीन आव्हान निर्माण झाले आहे़ सूत्रांच्या मते, सर्वाधिक निकृष्ट दर्जाचा औषध पुरवठा हिमाचल प्रदेशातून येत आहे. यानंतर उत्तराखंड व गुजरातचा क्रमांक लागतो. एफडीएने एप्रिल २०१४ ते नोव्हेंबर २०१४ या कालावधीत संकलित केलेल्या नमुन्यांमध्ये हिमाचल प्रदेशातून आलेला औषध साठा निकृष्ट दर्जाचा असल्याचे आढळून आले आहे. हिमाचल प्रदेशातील १०५ औषधी निकृष्ट दर्जाची आढळली. याच प्रमाणे उत्तराखंडची ५० व गुजरातची ३० औषध नमुने दर्जाहीन असल्याचे निष्पन्न झाले.एफडीएच्या मते, एप्रिल ते नोव्हेंबर या काळात अन्य राज्यांतील कंपन्यांचे एकूण १९७३ औषध नमुने गोळा केले होते. यात एफडीएच्या मापदंडानुसार, २४२ अर्थात १२.२६ टक्के नमूने निकृष्ट दर्जाची निघाली. यानंतर एफडीएने ही औषधी ‘सेवन करण्यास हानिकारक’ असल्याचे घोषित करुन यांचा साठा तात्काळ जप्त केला होता. यात हिमाचल प्रदेशचे १०५, उत्तराखंडचे ५०, गुजरातचे ३०, मध्यप्रदेशचे १३, आंध्र व उत्तर प्रदेशचे प्रत्येकी ८, राजस्थानचे ५, कर्नाटक, पश्चिम बंगाल, पुद्दुचेरी, हरियाणा आणि पंजाब या राज्यांतील प्रत्येकी २ नमुने निकृष्ट दर्जाचे आढळून आले. दिल्ली, झारखंड, जम्मू काश्मीर, चंदीगड आणि दीव व दमण येथे तयार झालेल्या औषधींपैकी प्रत्येकी १ नमुना दर्जाहीन असल्याचे दिसून आले.औरंगाबाद, मुंबईत चाचणीगोळा केलेल्या औषध नमुन्यांची मुंबई व औरंगाबाद येथील प्रयोगशाळेत चाचणी करण्यात आली. फेरपडताळणीसाठी हे नमुने अन्यत्रही पाठवले होते. दोन्ही ठिकाणचे अहवाल सारखेच आले. एफडीएचे संयुक्त आयुक्त ज्ञानेश्वर फडतरे यांनी यासंदर्भातील अडचणींची कबुली देत यास प्रतिबंध घालण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. औद्योगिक विकासात देशात ‘नंबर वन’ महाराष्ट्रातील औषध कंपन्यांही दर्जाहीन निर्मितीत आघाडीवर असल्याचे दिसून आले आहे. महाराष्ट्र तयार होत असलेल्या औषधींपैकी ७.१९ टक्के नमुने निकृष्ट आढळले.