पनवेल : नवीन पनवेल येथून खारघर येथील शाळेत जाणाऱ्या शिक्षिकेचा विनयभंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शुक्रवारी सकाळी खांदा वसाहतीत घडलेल्या या प्रकारामुळे शिक्षिकेने (२३) न घाबरता, आरोपीचा पाठलाग करून पोलिसांच्या ताब्यात दिले. शंकर पासवान (२६) असे आरोपीचे नाव असून तो सेंट जोसेफ शाळेसमोरील झोपडीत राहतो. संबंधित आरोपीने गेल्या महिन्यातही असा प्रकार शिक्षिकेबरोबर केला होता. त्यावेळी तिने खांदेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. शुक्रवारी सकाळी संबंधित शिक्षिका नवीन पनवेलहून पायी येताना खांदा वसाहतीच्या ब्रिजखाली पासवानने तिला अडवले व जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. शिक्षिकेने आरडाओरडा करताच पासवानने पळ काढला.
शिक्षिकेचा विनयभंग
By admin | Updated: March 19, 2016 00:57 IST