शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
6
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
8
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
9
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
10
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
11
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
12
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
13
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
14
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
15
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
16
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
17
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
18
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
19
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
20
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?

न्यू हॉरिझोनमध्ये शालेय साहित्यांची सक्ती

By admin | Updated: March 19, 2017 05:35 IST

शालेय पुस्तकांवर विशिष्ट कंपनीच्या किमतींचे लेबल काढून शाळा प्रशासनाकडून नेहमीच चढ्या दराने पुस्तकांची विक्र ी केली जात आहे. या किमतींवर कुणाचेच नियंत्रण

- अरुणकुमार मेहत्रे,  कळंबोर्लीशालेय पुस्तकांवर विशिष्ट कंपनीच्या किमतींचे लेबल काढून शाळा प्रशासनाकडून नेहमीच चढ्या दराने पुस्तकांची विक्र ी केली जात आहे. या किमतींवर कुणाचेच नियंत्रण नसल्याचे दिसून येत आहे. शनिवारी खांदा वसाहतीतील न्यू हॉरिझोन शाळेत हाच प्रकार निदर्शनास आला. शालेय पुस्ताकांबरोबरच वह्या, नोटपॅड, क व्हर, ग्राफपेपर, स्क्रॅबबुक आदींचीही सक्ती करण्यात आल्याने पालकांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. पालकांच्या वाढत्या विरोधामुळे अखेर शाळा व्यवस्थापनाने नरमाईची भूमिका घेतली. एकीकडे सरकार दप्तरांचे ओझे कमी करण्याचे फतवे काढते; पण दुसरीकडे खासगी शाळांमध्ये अगदी नर्सरीपासून ते दहावीपर्यंत पुस्तकांचे ओझे मुलांना वाहावे लागते. पनवेल परिसरात खासगी शाळांचे पेव फुटले असून, या शाळांमधून विद्यार्थ्यांकडे एक ग्राहक म्हणून पाहिले जात आहे. शैक्षणिक दर्जा सुधारण्याच्या नावाखाली शाळांकडून शालेय पुस्तके, शैक्षणिक साहित्य खरेदीची सक्ती करून पालकांची आर्थिक लूट केली जात आहे. त्यासाठी विविध प्रकाशने आणि शाळांमध्ये आर्थिक हितसंबंध निर्माण झाले आहेत. त्याचा फटका पालकांच्या खिशाला बसत आहे. शाळेला ‘सॅम्पल कॉपी नॉट फॉर सेल’ असे स्टिकर चिकटविलेली पुस्तके देण्यात येतात. ही पुस्तके अभ्यासक्रमांसाठी बंधनकारक नसतात. मात्र, तरीही खरेदी करण्याची सक्ती केली जाते. हीच परिस्थिती तर शालेय साहित्याबाबत आहे. खांदा वसाहतीतील न्यू हॉरिझोन शाळेत आगामी शैक्षणिक वर्षासाठी पुस्तकांबरोबरच वह्या, नोटपॅड, पेन्सिल्स, कव्हर, स्टिकर, चित्रकलेची वही, क्राफ्टपेपर आदी वस्तूंची आवश्यक नसताना खरेदीची सक्ती करण्यात येत आहे. त्याचबरोबर काही पुस्तकांच्या किमती वाढविण्यात आलेल्या आहेत. सातवीकरिता रत्नासागर पब्लिकेशनच्या समाजशास्त्राच्या पुस्तकाची किंमत जवळपास साडेचारशे रुपये लावण्यात आली आहे. या व्यतिरिक्त इतर पुस्तकांच्या किमती तीनशे रुपयांचा घरात आहेत. केवळ सातवीच नव्हे, तर इतर वर्गांकरिता जास्त किमतीचे पुस्तक घेण्याची सक्ती करण्यात येत आहे. नवीन शैक्षणिक वर्षाकरिता शनिवारी शाळेमध्ये शिवम बुक्सच्या वतीने पुस्तक आणि शालेय साहित्य उपलब्ध करून देण्यात आले. त्यावेळी हा प्रकार लक्षात आल्याने पालकांनी नाराजी व्यक्त केली. पुस्तकाच्या किमती या पब्लिकेशनकडून ठरवण्यात येतात, त्या वाढविण्याचा विषयच येत नाही. पुस्तक, वह्या, तसेच इतर साहित्य असा संच विद्यार्थ्यांना दिला जातो. मात्र, काही वस्तू मागील वर्षाच्या असतील. त्यानुसार जे साहित्य हवे तेच देण्याबाबत संबंधितांना सूचना दिल्या जातील.- प्रशांत मूकवार, मुख्याध्यापकन्यू हॉरिझोन, खांदा वसाहत