शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी २०० देश फिरले, पण एकही पाठिशी नाही; शिष्टमंडळाच्या वऱ्हाडावर बहिष्कार टाकला पाहिजे”
2
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
3
मेकर्ससोबतच्या क्रिएटिव्ह मतभेदांमुळे सोडला 'हेरा फेरी ३'? परेश रावल ट्वीट करत म्हणाले...
4
पोखरणच्या जमिनीवर 'असा' झाला स्फोट, अमेरिकाही हादरली; आजच्या दिवशी भारताची दखल जगानं घेतली
5
पाकची नवी चाल! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?
6
गिलख्रिस्टच्या IPL संघात विराटला स्थान नाही, Mumbai Indiansचे ५ जण, कर्णधार कोण?
7
पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान भारत आणि अफगाणिस्तानमधील व्यापार पुन्हा सुरू
8
आयडियाची कल्पना झाली फेल! बेपत्ता झालेला गुरुग्रामचा आयटी मॅनेजर पकडला गेला अन् समोर आलं खरं कारण
9
अटकेत पाकिस्तानी स्पाय? ज्योती मल्होत्राची कमाई किती? कोरोनात नोकरी गेली अन्... पाकिस्तानही फिरून आली...
10
Hyundai ने आखली मोठी योजना! भारतात लॉन्च करणार 20 पेट्रोल-डिझेल अन् 6 EV कार
11
तुम्हीही एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरता? मग फायद्यासोबत हे तोटे माहिती आहे का?
12
कोण आहे पाकिस्तानी अधिकारी, ज्याच्या जाळ्यात अडकली ज्योती?; भारताने देशाबाहेर काढले होते
13
"विराट कोहलीला क्रिकेटमधील योगदानासाठी 'भारतरत्न' द्या"; स्टार माजी क्रिकेटपटूने केली मागणी
14
हैदराबादमधील गुलजार हाऊसजवळ भीषण आग, १७ जणांचा होरपळून मृत्यू; अनेक जण गंभीर जखमी
15
Video: "असा धडा शिकवणार, की..."; सैन्यानं जारी केला 'ऑपरेशन सिंदूर'चा आणखी एक व्हिडिओ
16
केरळात मान्सून वाऱ्याच्या वेगाने दाखल होणारा, ढग भरभरून पाऊस देणार
17
करण जोहरच्या 'तख्त' सिनेमाचं पुढे काय झालं? पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत म्हणाला, "तो सिनेमा..."
18
ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यासोबत बालीलाही गेलेली; वडील कारपेंटर, मुलीची लक्झरी लाईफ, नेमके करायची तरी काय...
19
टेरिफ वॉरची खुमखुमी अन् अमेरिकेचा तिळपापड! मूडीजने क्रेडिट रेटिंग घटविताच...
20
२५ लाख दे, नाहीतर मरून जा; पत्नीने दिली धमकी! शिक्षक पतीने उचलले दुर्दैवी पाऊल

सावरसई गावचा ‘एक गाव एक गणपती’

By admin | Updated: September 8, 2016 03:04 IST

भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या चळवळीला व्यापक अधिष्ठान मिळावे यासाठी लोकमान्य टिळकांनी महाराष्ट्रातील विखुरलेल्या समाजाला एकत्र आणण्यासाठी सुरू केलेला सार्वजनिक गणेशोत्सव

दत्ता म्हात्रे, पेणभारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या चळवळीला व्यापक अधिष्ठान मिळावे यासाठी लोकमान्य टिळकांनी महाराष्ट्रातील विखुरलेल्या समाजाला एकत्र आणण्यासाठी सुरू केलेला सार्वजनिक गणेशोत्सव बघता बघता शतकोत्तर रौप्य महोत्सवाकडे वाटचाल करत आहे. या सव्वाशे वर्षात गणेशोत्सवाचे स्वरूप बदलले आहे. या उत्सवाच्या स्वरूपात आमूलाग्र्र बदल घडत गेलेले आपण पाहिले, विज्ञान तंत्रज्ञानाची भर उत्सवात पडलेली दिसून येत आहे. हा उत्सव कोट्यवधी भाविकांच्या मनमंदिरात आपले स्थान अबाधित ठेवून आहे. पेणच्या पर्यावरण क्षेत्रातील सावरसई ‘एक गाव एक गणपती’ ही परंपरा गेली २५ वर्षे अबाधित आहे. सामाजिक बांधिलकी, गावची एकता अखंडता कायम ठेवीत पाच दिवसांच्या गणरायांचे गावकरी विविध उपक्रम राबवून गणेशोत्सव साजरा करतात, तेही शांतता व उत्सवाचे पावित्र्य राखून.पेण-खोपोली रस्त्यावर वसलेले सावरसई गाव. या गावाची तरुणाई, महिला मंडळ, आदिवासी समाज या सर्वांना एकत्रित घेऊन उत्सवाची परंपरा कायम राखल्याने गावाचा एकच गणपती म्हणून उत्सवाच्या पाच दिवस सबंध गावकरी उत्सवात आनंदाने सहभागी होतात. सावरसई ग्रामपंचायतीने गावच्या सांघिक शक्तीच्या जोरावर शासनाची डझनभर पारितोषिके याशिवाय सामाजिक संस्थांनीसुद्धा या गावाला आदर्श गाव म्हणून गौरविले आहे. सध्या युवा पिढीच्या हाती उत्सवाची जबाबदारी असून महिला, युवा, युवती व ज्येष्ठांच्या विचारांच्या आदान प्रदानातून उत्सवाचे नियोजन होते. सकाळी श्री आरती, प्रसाद, दुपारी स्थानिक कलाकारांची नाच गाणी, यात महिलांच्या गणपतीवर आधारित आदिवासी समाजाची लोकशक्ती, एकच बाप्पा असल्याने रात्री उत्सव सभागृहात गावकी जमा होते.इच्छाशक्ती, एकमेकांप्रती आदरभाव व गाव विकासाच्या संकल्पनेला गणेशाचा आशीर्वाद मिळतो. युवाशक्तीचे योगेश दिवेकर, मार्गदर्शक नीळकंठ दिवेकर, उपसरपंच सुरेश पाटील, चंद्रकांत दिवेकर, भगवान सावंत, महिला मंडळाच्या सारिका दिवेकर व सामाजिक राजकीय क्षेत्रातील गावचे प्रस्थ महादेव दिवेकर या सर्वांनी गाव आणि गावाचे गावपण राखले आहे.