शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
3
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
4
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
5
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
6
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
7
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
8
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
9
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
10
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
11
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
12
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
13
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
14
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
15
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
16
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
17
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
18
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
19
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
20
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!

सराईत वाहनचोराला अटक

By admin | Updated: May 7, 2016 00:47 IST

पनवेल परिसरात वाहनचोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला खांदेश्वर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून ६ गुन्ह्यांची उकल झाली असून चोरीच्या ९ मोटारसायकली जप्त करण्यात

नवी मुंबई : पनवेल परिसरात वाहनचोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला खांदेश्वर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून ६ गुन्ह्यांची उकल झाली असून चोरीच्या ९ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. हा चोरटा बीडचा राहणारा असून गुन्ह्यासाठी पनवेल परिसरात यायचा.खांदेश्वर परिसरात सोने विक्रीसाठी एक जण येणार असल्याची माहिती खांदेश्वर पोलिसांना मिळाली होती. यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक एस. गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचला असता अमोल बळे (२८) याला अटक करण्यात आली. पनवेल परिसरात त्याने मोटारसायकल चोरीसह घरफोडीचे देखील गुन्हे केल्याचे परिमंडळ २ चे उपआयुक्त विश्वास पांढरे यांनी सांगितले. बळे हा बीड जिल्ह्यातील साबलखेड गावचा राहणारा असून घरालगतच त्याचे गॅरेज आहे. या गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी येणाऱ्या वाहनांमध्ये लागणाऱ्या पार्टसाठी तो वाहनांची चोरी करायचा. याकरिता तो पनवेल परिसरात येवून मोटारसायकली चोरून त्या बीडला घेवून जायचा. अशाप्रकारे त्याने ३० हून अधिक वाहनांची चोरी केल्याची शक्यता आहे. त्यापैकी ६ गुन्ह्यांची उकल झाली असून त्यामधील ९ मोटारसायकली जप्त केल्याचे उपआयुक्त विश्वास पांढरे यांनी सांगितले. चोरीची वाहने गॅरेजमध्येच ठेवायचा. या दरम्यान दुरुस्तीसाठी आलेल्या मोटारसायकलसाठी चोरीच्या मोटारसायकलचे पार्ट वापरायचा. (प्रतिनिधी)