शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

नेरूळमध्ये आमदार निधीतून स्वच्छतागृह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 01:52 IST

स्वच्छ भारत अभियानाचा एक भाग म्हणून बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी आपल्या आमदार निधीतून नेरूळ सेक्टर १८ येथे एक सुसज्ज स्वच्छतागृह उभारले आहे.

नवी मुंबई : स्वच्छ भारत अभियानाचा एक भाग म्हणून बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी आपल्या आमदार निधीतून नेरूळ सेक्टर १८ येथे एक सुसज्ज स्वच्छतागृह उभारले आहे. पामबीच मार्गालगतच्या सर्व्हिस रोडवर हे स्वच्छतागृह उभारण्यात आले आहे. या परिसरात मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी हे स्वच्छतागृह सोयीचे ठरले आहे.महापालिकेच्या माध्यमातून शहरात ठिकठिकाणी ई-टॉयलेट उभारले आहेत. परंतु नियमित देखभाल तसेच विविध तांत्रिक अडचणीमुळे या ई-टॉयलेटचा नागरिकांना फारसा लाभ होताना दिसत नाही. पामबीच मार्गावर मॉर्निंग वॉकसाठी मोठ्या प्रमाणात रहिवासी येतात. या मार्गालगतच्या सर्व्हिस रोडवर सकाळ, संध्याकाळ नागरिकांची एकच गर्दी असते. परंतु या ठिकाणी एकही स्वच्छतागृह नसल्याने महिला व ज्येष्ठ नागरिकांची मोठी गैरसोय होत होती. या पार्श्वभूमीवर येथील रहिवाशांनी नेरूळ सेक्टर १८ येथे पामबीच मार्गाजवळ स्वच्छतागृह उभारण्याची मागणी आमदार मंदा म्हात्रे यांच्याकडे केली होती. त्यानुसार मंदा म्हात्रे यांनी आपल्या आमदार निधीतून या ठिकाणी सुसज्ज असे स्वच्छतागृह उभारले आहे. अलीकडेच ते नागरिकांसाठी खुले करण्यात आले आहे. त्यामुळे येथील रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.