शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
2
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
3
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
4
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
5
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
6
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
7
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
8
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
9
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
10
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
11
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
12
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
13
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
14
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
15
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
16
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
17
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
18
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
19
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?

निरूपणातून समर्थ समाजनिर्मिती

By admin | Updated: May 14, 2016 01:00 IST

मानवता म्हणजे मुळात मानवी मनातली एकात्मता. कोणताही माणूस मग त्याचा धर्म, जात, पंथ, देश, प्रांत, कोणताही असो त्याचा धर्म एकमेव मानवता हाच असणे अपेक्षित आहे

जयंत धुळप, अलिबागमानवता म्हणजे मुळात मानवी मनातली एकात्मता. कोणताही माणूस मग त्याचा धर्म, जात, पंथ, देश, प्रांत, कोणताही असो त्याचा धर्म एकमेव मानवता हाच असणे अपेक्षित आहे. मानवतेपेक्षा मोठा अन्य कोणताही धर्म मानवी जीवनात नाही, असा मानवतेचा गाभा ज्येष्ठ निरुपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी विषद केला आहे.नम्रता, विश्वास, स्नेह, सहनशीलता आणि आदरभाव यांची मानवामध्ये कमतरता निर्माण झाली की, तो अमानवी वर्तनाकडे वळतो आणि मानवतावादी विचारांत असमतोल निर्माण होतो. मानवी मूल्यांच्या अस्तित्वाचाच जेव्हा प्रश्न निर्माण होतो, त्यावेळी दासबोधाच्या सोप्या मौखिक निरुपणातून विकारी मनाची मशागत करुन निर्व्यसनी समर्थ समाजाचे स्वप्न सत्यात उतरवण्याचा यशस्वी प्रयत्न बैठकांच्या माध्यमातून सुरु असल्याचे ज्येष्ठ निरुपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी सांगतात.बैठकीच्या माध्यमातून आध्यात्मिकतेबरोबरच वर्तमान विश्वाच्या वास्तवाचे भान ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेबांकडून प्राप्त होत असते. त्यातूनच जागतिक पर्यावरण समस्या, दुष्काळ आणि जलदुर्भिक्ष, व्यसनाधीनता, मानवी आणि सामाजिक आरोग्य अशा अत्यंत महत्त्वाच्या आणि आजच्या कळीच्या समस्यांचे निराकरण बैठकीच्या सदस्यांच्या माध्यमातून स्वेच्छेने होत आहे. शासकीय यंत्रणा आजवर जे लक्ष्य साध्य करु शकली नाही, ते लक्ष्य बैठक सदस्यांच्या सामूहिक श्रमदानातून साध्य झाले आहे. राज्यपालांच्या उपस्थितीत शुभारंभ झालेल्या मुंबई शहराच्या स्वच्छता मोहिमेत किमान दीड लाख बैठक सदस्य सक्रिय सहभागी झाले आणि एकदा नव्हे तर दोन वेळा देशाची आर्थिक राजधानी असणारी मुंबई स्वच्छ झाली. मुंबईसह राज्यातील सुमारे ८० शहरे आणि हजारो खेड्यांमध्ये याच पद्धतीने सार्वजनिक स्वच्छता झाली. मनाच्या सक्षमतेकरिता आरोग्य उत्तम असले पाहिजे आणि त्यासाठी सार्वजनिक स्वच्छता अत्यावश्यक आहे. अस्वच्छता अखेर आपणच करीत असतो परिणामी ती दूर करण्याची जबाबदारी सरकारची नव्हे तर आपलीच आहे, असा विचार बैठकांच्या माध्यमातून मनावर बिंबवल्यावर आपोआपच बैठकीतील सारे सदस्य स्वच्छतादूत बनले आणि श्रमदानातून ही सार्वजनिक स्वच्छता वास्तवात उतरली.वातावरणाचा असमतोल हा निसर्गाचा लहरीपणा आहे, असे वरकरणी आपण बोलत असतो तरी या नैसर्गिक असमतोलास मानवच कारणीभूत असल्याचा विचार डॉ.आप्पासाहेबांनी दिला आणि त्यातून पर्यावरण संवर्धनाची महामोहीम त्यांच्या मार्गदर्शनाखाली हाती घेण्यात आली. बेसुमार वृक्षतोडीमुळे पावसावर परिणाम झाला. पावसाचे प्रमाण कमी झाले. त्यातून जलदुर्भिक्ष निर्माण झाले आणि या साऱ्या समस्यांना आपण कारणीभूत असल्याने आपणच त्या समस्या सोडविल्या पाहिजेत. या विचारातून वृक्षारोपण मोहीम हाती घेण्यात आली. वृक्ष केवळ लावायचे नाहीत तर त्यांचे संवर्धन देखील आपणच करायचे असा विचार डॉ. आप्पासाहेबांनी मनामनात रुजवला आणि लाखो सदस्यांच्या माध्यमातून वृक्ष लागवड व संवर्धनाची मोहीम यशस्वी झाली.