शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पग्रस्तांच्या त्यागाला मुख्यमंत्र्यांचा सलाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 00:51 IST

मुंबईला पर्याय म्हणून नवी मुंबई शहराची निर्मिती करण्यात आली. त्यासाठी येथील स्थानिक भूमिपुत्रांनी आपल्या जमिनी दिल्या.

कमलाकर कांबळे नवी मुंबई : मुंबईला पर्याय म्हणून नवी मुंबई शहराची निर्मिती करण्यात आली. त्यासाठी येथील स्थानिक भूमिपुत्रांनी आपल्या जमिनी दिल्या. त्यांच्या त्यागावर आज नवी मुंबई हे अत्याधुनिक शहर उभारले आहे. देशाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ याच शहरात उभारले जात आहे. या प्रकल्पासाठीही स्थानिकांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या. इतकेच नव्हे, तर दहा गांवाचे चक्क स्थलांतरण करण्यात आले. त्यामुळे या विमानतळाच्या उभारणीचे सर्व श्रेय स्थानिक प्रकल्पग्रस्तांना देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या त्यागाला सलाम केला.स्वातंत्र्यानंतर देशात सर्वात मोठे पहिले ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी मुंबईत उभारले जात आहे. पनवेल तालुक्यातील उलवे येथे २२६८ हेक्टर जागेवर सुमारे १६ हजार कोटी रुपये खर्च करून हा प्रकल्प उभारला जात आहे. रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पाच्या कामाची पायाभरणी करण्यात आली. नवी मुंबई विमानतळासाठी ६७१ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. त्यासाठी दहा गावे स्थलांतरित केली जाणार असल्याने या गावांचे मूळ अस्तित्व संपुष्टात येणार आहे. स्थलांतरित होणाºया गावांचे वहाळ आणि वडघर येथे पुनर्वसन करण्यात येणार आहे. तर ज्यांच्या केवळ जमिनी संपादित केल्या आहेत, त्यांच्यासाठी नियोजित पुष्पकनगरमध्ये २२.५ टक्के विकसित भूखंड दिले आहेत. विमानतळ प्रकल्पाला आपल्या जमिनी देणाºया प्रकल्पग्रस्तांना सर्वोच्च पुनर्वसन पॅकेज देण्यात आले आहे. शहराच्या विकासाला मिळणारी गती, भावी पिढीच्या उत्कर्षाचा मार्ग आदी स्तरावर प्रकल्पग्रस्तांचे प्रबोधन करण्यात राज्य सरकार आणि सिडकोला यश आले. त्याचाच परिणाम म्हणून १०७१ नंतर पुन्हा आपल्या जमिनीचा त्याग करून प्रकल्पग्रस्तांनी आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाचा मार्ग मोकळा केला.तसेच देशातील सर्वात मोठे जेएनपीटी बंदर प्रकल्पग्रस्तांच्याच जमिनीवर उभारले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या या त्यागाची जाणीव ठेवत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत त्यांचा गौरव केला.पुनर्वसनाच्या मुद्द्यावरून सिडकोसंदर्भातील प्रकल्पग्रस्तांचा पूर्वानुभव फारसा चांगला नाही. पाल्यांना नोकरी, शैक्षणिक सुविधा, साडेबारा टक्के विकसित भूखंड, गावठाण विस्तार, गरजेपोटीची बांधकामे नियमित करणे आदी प्रश्नांसाठी प्रकल्पग्रस्तांना आजही संघर्ष करावा लागत आहे. विमानतळ प्रकल्पपूर्ण झाल्यानंतर प्रकल्पग्रस्तांना दिलेल्या आश्वासनाचा राज्य सरकारला विसर पडू नये, असे सर्वसामान्यांचा सूर आहे.