शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

यूपीच्या रिव्हॉल्व्हरची ठाण्यात विक्री

By admin | Updated: October 1, 2014 02:36 IST

गेल्या आठवडय़ापासून राबविलेल्या एका विशेष मोहिमेत ठाणो पोलिसांनी लाखो रुपयांची 17 अग्निशस्त्रे हस्तगत केली.

ठाणो :  निवडणुका स्वच्छ आणि भयमुक्त वातावरणात पार पडण्यासाठी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार गेल्या आठवडय़ापासून राबविलेल्या एका विशेष मोहिमेत ठाणो पोलिसांनी लाखो रुपयांची 17 अग्निशस्त्रे हस्तगत केली. यात 17 बंदुकांसह 38 काडतुसांचा समावेश आहे. यातील काही शस्त्रे उत्तर प्रदेशच्या वाराणसीतून 25 हजारांना आणून ती ठाणो परिसरात 5क् ते 6क् हजारांना विकल्याचीही माहिती उघड झाली आहे.
गुन्हे अन्वेषण विभागाच्या कल्याण, भिवंडी, ठाणो आणि मध्यवर्ती पथकांनी गेल्या काही दिवसांमध्ये राबविलेल्या मोहिमेची माहिती पोलीस उपायुक्त पराग मणोरे यांनी दिली. कल्याणच्या युनिट 3चे पोलीस निरीक्षक शिवाजी धुमाळ यांच्या पथकाने 21 सप्टेंबर रोजी सुरेश रामजी सिंग (42 रा. तळोजा, एमआयडीसी) याच्याकडून एक पिस्तूल, 2 रिव्हॉल्व्हर आणि 15 काडतुसे हस्तगत केली. विशेष म्हणजे सुरेश हा तळोजामध्ये सुरक्षारक्षक म्हणून काम करतो. त्याने वाराणसी (यूपी) येथून 25 ते 3क् हजारांमध्ये एक रिव्हॉल्व्हर विकत घेतले. ते कल्याण परिसरात 5क् ते 6क् हजारांना तो विकत असे. त्याने योगेश पाटील याला एक रिव्हॉल्व्हर आणि 5 काडतुसे 55 हजारांना विकली होती. 24 सप्टेंबर रोजी त्याच्याकडून हे रिव्हॉल्व्हर आणि काडतुसे हस्तगत करण्यात आली. सुरेशचा यूपीचा साथीदार दीपक लाला आणि ज्या टोळीकडून ही शस्त्रे विकत घेतली जायची, त्यांचा शोध घेण्यासाठी ठाणो पोलीस वाराणसीला रवाना झाले आहेत.
24 सप्टेंबर रोजी ठाणो खंडणीविरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक एन.टी. कदम यांच्या पथकाने माजिवडा पॉवर हाउस भागातून मुन्ना गोसावी (39) याच्याकडून एक गावठी बनावटीचा कट्टा आणि 3 काडतुसे हस्तगत केली. 
याशिवाय, 26 सप्टेंबर रोजी  सखाराम वाघमारे (2क्, रा. देवघर, जि. पुणो), जावेद अन्सारी (23, रा. मुंब्रा), महेंद्र वाघे (26, रा. मुंब्रा), मोईद्दीन अन्सारी (19) यांनाही शस्त्र बाळगल्याप्रकरणी अटक केली आहे. वाघमारे याच्याकडून 7.65 कॅलीबरचे एक पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत. महेंद्र आणि रेहान यांच्याकडून दोन गावठी कट्टे आणि 4 काडतुसे जप्त करण्यात आली. 
29 सप्टेंबर रोजी चिंतराम ब्राrाणो (19, रा. सेंदवा, मध्य प्रदेश), सुकराज सेन (23, रा. राजस्थान) यांच्याकडूनही 1 लाख 1क् हजारांची 4 पिस्तुले, 1 गावठी कट्टा आणि 5 काडतुसे हस्तगत करण्यात आली. 
भिवंडीच्या देवानंद पाटील (4क्) याच्याकडूनही 1 पिस्तूल आणि 3 जिवंत काडतुसे जप्त करून त्याला अटक केल्याची माहिती डोईफोडे यांनी दिली. (प्रतिनिधी)
 
गावठी कट्टा जप्त 
अमली पदार्थविरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक मंदार धर्माधिकारी यांनी ठाण्याच्या आरटीओ कार्यालयासमोरून एकाला मोटारसायकलसह ताब्यात घेऊन त्याच्याकडून एक गावठी कट्टा हस्तगत केला.  भिवंडीच्या युनिट 2चे पोलीस निरीक्षक बुधवंत यांच्या पथकाने 3क् सप्टेंबर रोजी एक गावठी कट्टा आणि एक काडतूस बाळगणा:यास अटक केली. याशिवाय, गुन्हे शाखेच्या युनिट 1चे पोलीस निरीक्षक रवींद्र डोईफोडे यांच्या पथकाने तलावपाळी भागातून विजय शिरसाठ (21 रा. लोणावळा, जि. पुणो) याच्याकडून एक गावठी बनावटीचा कट्टा हस्तगत केला आहे. अशाच कारवाया अन्यत्रही केल्या आहेत.