शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
2
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
3
बी २ बॉम्बर बनविणारा भारतीय इंजिनिअर होता, मती फिरली आणि चीनला गेला...
4
अरबी समुद्र, बंगालच्या उपसागराबाबत WMO चा भयानक रिपोर्ट; भारताच्या किनारपट्टीवरील शहरांना धोका
5
'ही' कंपनी दिवाळखोर होण्यापासून वाचवणार सरकार! गुंतवणूकदारांच्या शेअरवर उड्या, ₹७ आहे किंमत
6
विमान प्रवास स्वस्त होणार! इंधन भरण्याचा त्रास संपणार, पहिल्यांदाच 'या' तंत्रज्ञानाचा वापर करुन विमान उड्डाण करणार
7
IND vs ENG: ऋषभ पंतची दोन डावात दोन शतकं, पण ICC ने केली कारवाई, कारण काय?
8
इराणच्या हल्ल्यात प्रचंड वित्तहानी, आयरन डोमच्या मर्यादा उघड, युद्धातून इस्राइलला मिळाले हे पाच धडे 
9
Raigad Boat Capsizes: रायगडमध्ये सावित्री नदीत बोट उलटली; काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ समोर!
10
कमी व्याजदरावर होम लोन घ्यायचंय? 'या' सरकारी बँका ठरू शकतात बेस्ट; ७.५०% पेक्षाही कमी आहेत दर 
11
ड्रॅगनची वळवळ; पँगाँग सरोवराजवळ चीन नेमकं करतोय काय? सॅटेलाईट फोटोंमधून झाली पोलखोल  
12
Raipur Crime: रायपूरमध्ये 'नीळ्या ड्रम'सारखी घटना, सुटकेसमध्ये सिमेंट भरुन गोठवला तरुणाचा मृतदेह
13
'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती देण्यासाठी पाकिस्तानने पैसे दिले'; लष्करातील गद्दार जवानाने उघड केले गुपित, बँके खात्यांची चौकशी सुरू
14
खासगी कंपन्यांना मिळणार वीजपुरवठ्याचा परवाना, अदानीचा ठाणे, नवी मुंबईवर दावा
15
Zerodha च्या कामथ बंधूंनी 'या' कंपनीचे २५० कोटींचे शेअर्स खरेदी केले; मार्केटमध्ये उतरण्यापूर्वी खेळला मोठा डाव 
16
"हिंदी भाषा काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत बोलली गेलीच पाहिजे, केंद्राने..."; अबू आझमींकडून हिंदीची वकिली
17
'ट्रॅजेडी क्वीन'वर येणार सिनेमा, 'या' अभिनेत्रीला ऑफर झाली मीना कुमारींची भूमिका
18
पहलगामच्या हल्ल्यात ३ नव्हे ४ दहशतवादी होते सामील; चौथा काय करत होता? ऐकून येईल चीड!
19
आठ महिन्यांत चौघांची हत्या; २० वर्षांच्या गँगस्टरचा एन्काऊंटरमध्ये खात्मा, VIDEO आला समोर
20
"कुठे आहेत नाना पाटेकर, प्रशांत दामले? कुठायत मराठी क्रिकेटपटू?"; हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून सवाल

सायन - पनवेल महामार्गावर वाढली वाहतूककोंडी, वाहतूक पोलिसांची तारेवरची कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 05:18 IST

गणेशोत्सवासाठी कोकण व पश्चिम महाराष्ट्रात जाणा-या वाहनांची संख्या वाढल्याने सायन - पनवेल महामार्गावर वाहतूककोंडी झाली. वाशी, सानपाडासह अंतर्गत रोडवरील ताणही वाढला होता. वाहतूक सुरळीत करताना पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागली.

नवी मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकण व पश्चिम महाराष्ट्रात जाणा-या वाहनांची संख्या वाढल्याने सायन - पनवेल महामार्गावर वाहतूककोंडी झाली. वाशी, सानपाडासह अंतर्गत रोडवरील ताणही वाढला होता. वाहतूक सुरळीत करताना पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागली.सायन - पनवेल महामार्गावर वाहतूककोंडी होऊ नये यासाठी पोलिसांनी अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून दिले होते. सायंकाळपर्यंत वाहतूक सुरळीत होती. वाशी टोलनाक्यावर वाहतूककोंडी होऊ नये यासाठी कोणत्याच वाहनांकडून टोल घेतला जात नव्हता. सायंकाळी सहानंतर सातारा, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, सांगली व कोकणाकडे जाणाºया वाहनांची संख्या प्रचंड वाढली. नेहमीपेक्षा चार ते पाच पट वाहने वाढल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होऊ लागली. तुर्भे एमआयडीसी पोलीस स्टेशनजवळील शरयू हुंडाई मोटर्सपासून वाशीपर्यंत वाहतूक जवळपास ठप्प झाली होती. ठाणे- बेलापूर रोडवरून येणारी वाहने व महामार्गावरून येणारी वाहने शरयू हुंडाईजवळ महामार्गावर एकत्र येत असल्याने तेथे वाहतूककोंडी होऊ लागली होती. एस. टी. महामंडळाने त्यांच्या बसेस मानखुर्द जकात नाक्याजवळ उभ्या केल्या होत्या. या बसेसविषयी माहिती नवी मुंबईमधील वाहतूक पोलिसांना दिली नाही. या सर्व बसेस रोडवर आल्याने मानखुर्द ते वाशी दरम्यान मोठ्या प्रमाणात कोंडी झाली होती. रात्री ८ ते ९ वाजेपर्यंत वाहतुकीचा बोजवारा उडाला होता. वाशी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड व त्यांच्या सहकाºयांनी योग्य समन्वय ठेवून वाहतूक सुरळीत केली.महामार्गावर झालेल्या वाहतूककोंडीमुळे अनेकांनी पामबीच रोडवरून व सानपाडा, नेरूळच्या अंतर्गत रोडवरून सीबीडीकडे जाण्यास सुरवात केली. यामुळे अंतर्गत रोडवरही वाहतूककोंडी झाली होती. पनवेल एस. टी. स्टँडच्या बाहेर नानासाहेब धर्माधिकारी पुलाखालीही मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली होती. ही कोंडी फोडताना पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागत होती.खासगी बसेस चालकांची बेशिस्तमहामार्गावर खासगी बसेस व इतर खासगी वाहनांच्या बेशिस्तपणामुळेही वाहतुकीवर परिणाम होऊ लागला होता. वाशी ते पनवेलदरम्यान एस. टी. च्या बसथांब्यावर खासगी बसेस थांबविल्या जात होत्या. महामार्गावर मध्येच वाहने उभी असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ लागला होता.पोलिसांची दिवस-रात्र मेहनतगणेशभक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी महामार्गावर जादा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पहाटे कर्तव्यावर आलेल्या वाहतूक पोलिसांना रात्री १२ नंतरही काम करावे लागले होते. रात्रपाळीलाही जादा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. वाहतूक सुरळीत करताना पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागली होती.एस. टी. बसेसमुळे कोंडीगणेशोत्सवासाठी एस. टी. महामंडळाने जादा बसेसची व्यवस्था केली होती. या बसेस महामार्गावर वाशी, सानपाडा, नेरूळ, सीबीडी, खारघर, कामोठे व कळंबोलीमध्ये महामार्गावरच उभ्या केल्या जात होत्या. याशिवाय मानखुर्द जकात नाक्याजवळ मोठ्या प्रमाणात एस. टी. बसेस उभ्या करण्यात आल्या व रात्री एकाच वेळी अनेक बसेस सोडल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी निर्माण झाली होती.