शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सवाच्या तोंडावर पूरग्रस्त महिलांना साडीवाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 01:33 IST

नगरसेवक दाम्पत्याचा पुढाकार : कोपरखैरणेतील रहिवाशांचा उत्स्फूर्त हातभार; नऊ लाखांचा निधी संकलित

नवी मुंबई : कोपरखैरणे येथील नगरसेवक शिवराम परशुराम पाटील आणि नगरसेविका अनिता शिवराम पाटील यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत परिसरातील नागरिकांनी पूरग्रस्तांसाठी नऊ लाख रुपयांचा निधी संकलित केला. या निधीतून कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त दहा गावांतील सुमारे तीन हजार महिलांना साडीवाटप करण्यात आले. विशेष म्हणजे, ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर पूरग्रस्त महिलांना ही मदत मिळाल्याने ग्रामस्थांनी नगरसेवक दाम्पत्य व त्यांच्या प्रभागातील रहिवाशांचे आभार मानले आहे.अस्मानी संकटामुळे कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील शेकडो गावे जलमय झाली. हजारो कुटुंबे उद्ध्वस्त झाली. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी संपूर्ण महाराष्ट्र धावून आला. मुंबईसह नवी मुंबई व ठाणे शहरातून मदतीचा ओघ सुरू झाला. तांदूळ, तेल, साबण, पाण्याच्या बाटली आदी साहित्यांसह विविध प्रकारची मदत पूरग्रस्तांपर्यंत पोहोचविण्यात आली.

शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख तथा नगरसेवक शिवराम पाटील व नगरसेविका अनिता पाटील यांनी आपल्या प्रभागातील नागरिकांना पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन केले. रहिवाशांनी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद देत तब्बल नऊ लाख रुपयांचा निधी गोळा केला. या निधीतून साडी, चोळी आणि परकर असे तीन हजार संच खरेदी करण्यात आले. कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील जवळपास दहा पूरग्रस्त गावांतील महिलांना ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर घरोघरी जाऊन त्याचे वाटप करण्यात आले. कोल्हापूर जिल्ह्यातील इंगळी आणि नेळेवाडी गावात अनुक्रमे १८०० व ७०० साड्यांचे वाटप करण्यात आले. तर सातारा जिल्ह्यातील टेबेवाडी, तळवे, महिंद, सनबूर, रवळे व उंदावणे या गावांतील ७०० पूरग्रस्त महिलांना साडी, चोळी व परकरचे वाटप करण्यात आले. यावेळी नगरसेवक शिवराम पाटील यांच्यासह माजी नगरसेवक विद्यानंद माने, विजय पराडकर, दिलीप ढवळे, संतोष मोरे, अनिव पाटील, शरद शिंदे, अ‍ॅड. शफिक खान, मोरेश्वर आगास्कर, उत्तम पहारे, गणेश कोळी, संदीप पाटील व हृषीकेश पाटील आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई