शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

पनवेलमधील ग्रामीण भाग समस्यांच्या गर्तेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 07:07 IST

पनवेल महापालिका क्षेत्रातील ग्रामीण भागातील समस्या दिवसेंदिवस वाढत असून त्यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त आहेत. पाणीपुरवठा व मलनि:सारण समितीचे सभापती नीलेश बाविस्कर यांनी नुकताच पालेखुर्द गावाचा पाहणी दौरा केला.

- वैभव गायकरपनवेल : - पनवेल महापालिका क्षेत्रातील ग्रामीण भागातील समस्या दिवसेंदिवस वाढत असून त्यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त आहेत. पाणीपुरवठा व मलनि:सारण समितीचे सभापती नीलेश बाविस्कर यांनी नुकताच पालेखुर्द गावाचा पाहणी दौरा केला. गावातील समस्यांची माहिती प्रशासनाला वारंवार दिली तरी योग्य उपाययोजना करण्यात येत नसल्याचे यावेळी बाविस्कर यांनी सांगितले.महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या २९ गावांच्या विकासाकडे प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचे जवळपास सर्वच नगरसेवकांकडून सांगण्यात येत आहे. गावांमध्ये पिण्याचे पाणी, पथदिवे, कचरा विल्हेवाट यासारख्या प्राथमिक सुविधांचा अभाव जाणवतो.पालेखुर्द गावात सांडपाणी निचरा होण्याबाबत कोणत्याच उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. गावातील गटारांचे पाणी एकत्र येऊन त्याचे डबक्यात रूपांतर झाले आहे. परिणामी परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने विविध आजार बळावत आहेत. गावातील पाणीपुरवठा अनियमित आहे. विशेष म्हणजे गावठाणाचा आराखडा अद्याप तयार करण्यात आला नसल्याने गावातील समस्या सोडविण्यात अडचणी येत आहेत. याआधी ग्रामपंचायतीमार्फत नियमित नालेसफाई तसेच गटारे, रस्ते दुरु स्तीची कामे केली जात असत, मात्र पालिकेच्या स्थापनेपासून विकासकामांना खीळ बसली आहे. सिडको हद्दीतील गावठाणांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने महापालिकेपेक्षा ग्रामपंचायतच बरी होती, असे म्हणण्याची वेळ परिसरातील नागरिकांवर आली आहे.पनवेल महापालिका हद्दीतील ग्रामीण भागातील विकासकामे रखडली आहे. पालिका प्रशासनाचा उदासीन कारभार या गोष्टीला कारणीभूत आहे. पनवेल महापालिका हागणदारीमुक्त असल्याचे केवळ कागदावर आहे. ग्रामीण भागात आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.- नीलेश बाविस्कर,सभापती, पाणीपुरवठा,मलनि:सारण समिती, पनवेलसत्ताधारी भाजपा आणि आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. या वादाचा परिणाम विकासकामांवर होत असलयाची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे. प्रशासन व सत्ताधाºयांनी एकत्र बसून विकासकामांचा अजेंडा तयार करणे गरजेचे असताना पनवेल महानगर पालिकेत हा विरोधाभास दिसून येत आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई