शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

दहीहंडी आयोजकांची डीजेसाठी धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2017 02:25 IST

पोलिसांकडून अडवणूक होत असल्याचा आरोप करत साऊंड व लाइट व्यावसायिकांनी मंगळवारी स्वातंत्र्यदिनी राज्यव्यापी आंदोलन पुकारले आहे.

नवी मुंबई : पोलिसांकडून अडवणूक होत असल्याचा आरोप करत साऊंड व लाइट व्यावसायिकांनी मंगळवारी स्वातंत्र्यदिनी राज्यव्यापी आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे दहीहंडी आयोजकांना डीजेच्या शोधात फिरावे लागत आहे. सोमवारी रात्रीपर्यंत अनेकांना डीजेची सोय झालेली नव्हती. यामुळे हंडी फोडताना डीजेच्या तालावर गोविंदांचे पाय थिरकतील की नाही याबाबत साशंकता आहे.ध्वनिक्षेपकासाठी कमाल ७५ डेसिबलपर्यंतची आवाजाची मर्यादा आखून देण्यात आली आहे. या निर्णयाविरोधात साऊंड व लाइट व्यावसायिकांनी राज्यव्यापी आंदोलन पुकारले आहे. ऐन स्वातंत्र्यदिनी त्यांच्याकडून मूक आंदोलनाचे शस्त्र उपसले गेल्यामुळे दहीहंडी आयोजकांची चांगलीच कोंडी झाली आहे. यंदा स्वातंत्र्यदिन व दहीहंडी एकत्र आल्यामुळे अनेक ठिकाणी उत्सव साजरा होणार आहे. मात्र उत्सवाची संपूर्ण तयारी झाली तरीही ध्वनिक्षेपक मिळत नसल्याने दहीहंडी आयोजकांना घाम फुटला आहे.दहीहंडी आयोजनाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात डीजे लावून गोविंदा व प्रेक्षकांच्या मनोरंजनाची सोय केली जात असते. यंदाही अनेक दहीहंडी आयोजकांनी विविध कार्यक्रम आखला. मात्र सर्व काही ठरल्याप्रमाणे निश्चित झालेले असताना नकार मिळत आहे तो फक्त साऊंड व्यावसायिकांकडून.ध्वनिक्षेपकाविना कार्यक्रम करायचा कसा असा प्रश्न दहीहंडी आयोजकांना पडला आहे. अनेक दहीहंडी आयोजकांनी प्रतिवर्षीचा भाड्याच्या डीजेवर होणारा खर्चाचा अंदाज काढून संपूर्ण सेट स्वत:च विकत घेतलेला आहे. अशा आयोजकांची मात्र या त्रासातून सुटका झाली आहे.दहीहंडीची संपूर्ण तयारी झाली असली तरीही अनेक आयोजकांना साऊंड सिस्टीम मिळालेली नाही. राज्यव्यापी संपाचे कारण सांगून साऊंड व्यावसायिकांकडून आयोजकांची अडवणूक केली जात आहेत. यामुळे डीजेच्या संपाचा फटका दहीहंडी उत्सवाला बसणार असून, गोविंदांचे थर रचत असताना डीजे वाजेल की नाही याबाबत साशंकता आहे.- वैभव नाईक,अध्यक्ष,वन वैभव कला क्रीडा निकेतन