शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

फेरीवाल्यांविरोधात पालिकेची धडक मोहीम

By admin | Updated: March 26, 2017 05:30 IST

महापालिका कार्यक्षेत्रामधील अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात धडक मोहीम सुरू झाली आहे. कोपरखैरणे, वाशी व

नवी मुंबई : महापालिका कार्यक्षेत्रामधील अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात धडक मोहीम सुरू झाली आहे. कोपरखैरणे, वाशी व तुर्भेमधील विनापरवाना रसवंतीगृह चालविणाऱ्यांसह इतर फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली असून त्यांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. नवी मुंबईमधील रस्ते, पदपथ व इतर सार्वजनिक ठिकाणी अतिक्रमण केलेल्या फेरीवाल्यांविरोधात जोरदार मोहीम सुरू आहे. शुक्रवारी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण व उपआयुक्त अमरीश पटनिगिरे यांनी सर्वच विभाग अधिकाऱ्यांना विशेष मोहीम राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत. कोपरखैरणेचे विभाग अधिकारी अशोक मढवी, वाशीतील महेंद्रसिंग ठोके व तुर्भेच्या अंगाई साळुंखे यांनी कारवाई सुरू केली आहे. शहरात सद्यस्थितीमध्ये राज्यातील विविध भागांतून उसाचे गुऱ्हाळ चालविणारे व्यवसाय करण्यासाठी आले आहेत. याशिवाय इतर ज्युस विक्रेत्यांनीही रस्ते, पदपथ व महत्त्वाच्या जागांवर अतिक्रमण केले आहे. यामुळे अनेक ठिकाणी सार्वजनिक वाहतुकीला व रहदारीला अडथळा निर्माण होऊ लागला होता. यामुळे विनापरवाना व्यवसाय करणाऱ्या रसवंतीगृहचालकांवरही कारवाई करण्यात आली आहे. लाकडी चरखे व इतर साहित्यही जप्त करण्यात आले असून, ते कोपरखैरणे डंपिंग ग्राउंडवर ठेवण्यात आले आहे. रसवंतीगृहचालकांविरोधात कारवाई सुरू झाल्याने शनिवारी अनेकांनी व्यवसाय बंद ठेवले आहेत. फेरीवाल्यांमध्ये पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पालिकेच्या पथकाकडून नियमितपणे कारवाई सुरू राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. कारवाई सुरू केल्यानंतर सायंकाळी आयुक्तांच्या बदलीचे वृत्त धडकले असले तरी प्रत्यक्षात कारवाईमध्ये खंड पडू दिला जाणार नाही. सोमवारपासून नेरुळ, बेलापूर, घणसोली व ऐरोलीमध्येही कारवाई सुरू केली जाणार आहे. (प्रतिनिधी)आयुक्त व वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली फेरीवाल्यांविरोधात नियमितपणे कारवाई सुरू झाली आहे. पदपथ, रस्ते व इतर महत्त्वाच्या जागा अडविणाऱ्या रसवंतीगृहचालकांवरही कारवाई केली असून ती नियमितपणे सुरू राहणार आहे. - अशोक मढवी, विभाग अधिकारी, कोपरखैरणे