शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

रोसलीनचे मिशन आॅलिम्पिक; राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये नेत्रदीपक कामगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 04:11 IST

पुणेमध्ये अ‍ॅथलेटिक्स फेडरेशनच्यावतीने आयोजित स्पर्धेमध्ये नवी मुंबईमधील रोसलीन लेवीसने दोन सुवर्णपदके मिळविली. पाच वर्षांपूर्वी सुरू झालेला यशाचा प्रवास तुर्कीमधील जागतिक शालेय स्पर्धांमध्येही कायम राहिला.

- प्राची सोनवणे 

नवी मुंबई : पुणेमध्ये अ‍ॅथलेटिक्स फेडरेशनच्यावतीने आयोजित स्पर्धेमध्ये नवी मुंबईमधील रोसलीन लेवीसने दोन सुवर्णपदके मिळविली. पाच वर्षांपूर्वी सुरू झालेला यशाचा प्रवास तुर्कीमधील जागतिक शालेय स्पर्धांमध्येही कायम राहिला. या स्पर्धेमध्ये मिळालेल्या रौप्य पदकाने तिच्यामध्ये आॅलिम्पिकमध्ये यश मिळविण्याची जिद्द निर्माण झाली असून त्या दिशेने प्रयत्न सुरू केले आहेत.अ‍ॅथलेटिक्समधील स्प्रींटिग प्रकारामध्ये नवी मुंबईच्या रोसलीन लेवीसने स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविणाºया वाशीच्या फादर अ‍ॅग्नेल स्कूलमध्ये १२ वीमध्ये शिक्षण घेत आहे. क्रीडा स्पर्धांमध्ये नेत्रदीपक कामगिरी करणाºया या खेळाडूने दहावीमध्ये ९२ टक्के गुण मिळविले होते. बारावीमध्येही चांगले गुण मिळविण्यासाठी अभ्यासावर लक्ष केंद्रित केले असताना धावण्याच्या सरावामध्येही एक दिवसाचाही खंड पडू दिला जात नाही. नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ स्पोर्टमधील प्रशिक्षक श्रीनिवास गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली सात वर्षांपासून ती कसून सराव करत आहे. रोज तीन तास न चुकता धावण्याचा सराव सुरू आहे. २०२० च्या टोकियो आॅलिम्पिकमध्ये देशाला सुवर्णपदक मिळवून देण्याचे स्वप्न तिने पाहिले आहे.देशासाठी पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यामध्ये कुठेही कसूर राहणार नाही यासाठी ती स्वत:, आई-वडील व प्रशिक्षक सदैव दक्ष आहेत. तिच्या आतापर्यंतच्या प्रवासावर एक दृष्टिक्षेप टाकला की तिने पाहिलेले स्वप्न प्रत्यक्षात येईल असा विश्वास सर्वांना वाटू लागला आहे. २०११ - १२ मध्ये पुणे येथे अ‍ॅथलेटिक फेडरेशनच्यावतीने घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये १४ वर्षे वयोगटामध्ये १०० मीटर स्प्रींटिगमध्ये तीन सुवर्णपदके मिळविलीच याशिवाय उंच उडीमध्येही सुवर्णपदकाला गवसणी घातली. तेव्हापासून सुरू झालेला यशाचा आलेख सदैव उंचावत राहिला आहे. तुर्कीमध्ये झालेल्या जागतिक शालेय स्पर्धेमध्ये तिने रौप्य पदक मिळविल्यामुळे पूर्ण देशवासीयांना तिच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत.अ‍ॅथलेटिक्स स्पर्धांमध्ये रोसलीनने जिल्हा, राज्य, राष्ट्रीय स्पर्धांमध्ये मिळविलेल्या यशाची दखल शासनाने घेतली आहे. दोन महिन्यांपूर्वीच शासनाने तिला शिष्यवृत्ती जाहीर केली आहे. प्रत्येक महिन्याला १२ हजार रुपये शिष्यवृत्ती मिळू लागली आहे. शिष्यवृत्तीच्या रकमेपेक्षा त्यामुळे तिच्यामध्ये निर्माण झालेला आत्मविश्वास व देशासाठीजागतिक स्पर्धांमध्ये यश मिळविण्यासाठी निर्माण झालेली जिद्द महत्त्वाची आहे.अ‍ॅथलेटिक्समध्ये यश मिळविणाºया या खेळाडूचे वडील खासगी कंपनीमध्ये नोकरी करत असून आई शिक्षिका आहे. तिच्या यशाचे आई - वडील दोघांनाही प्रचंड कौतुक असून अभ्यास व खेळ दोन्हींचा योग्य समन्वय साधण्यातही तिने यश मिळविले असल्याची प्रतिक्रिया वडिलांनी दिली आहे.मिशन २०२०आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षक श्रीनिवास गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली रोसलीनचा सराव सुरू आहे. त्यांनी तिच्यामधील गुणवत्तेविषयी प्रतिक्रिया देताना सांगितले की, सात वर्षांपासून ती कसून सराव करत आहे. तिची प्रगती पाहून आम्हालाही अभिमान वाटत आहे. २०२० मध्ये टोकियोमध्ये होणाºया आॅलिम्पिकमध्ये निवड होण्यासाठी ती प्रचंड मेहनत घेत आहे. तिने सुवर्णपदक मिळवून नवी मुंबईचे व देशाचे नावही रोषण करावे, अशी प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली आहे.