शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

दिघा धरणाच्या पाण्यासाठी रस्सीखेच

By admin | Updated: April 25, 2016 03:15 IST

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून दुर्लक्षित राहिलेल्या दिघा धरणाला दुष्काळामुळे अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. ठाणे व नवी मुंबई महापालिकेने या धरणाचे पाणी मिळावे

नामदेव मोरे, नवी मुंबईदेशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून दुर्लक्षित राहिलेल्या दिघा धरणाला दुष्काळामुळे अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. ठाणे व नवी मुंबई महापालिकेने या धरणाचे पाणी मिळावे यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. श्रेयासाठी राजकीय वादही सुरू झाला असून या भांडणामध्ये धरणाच्या जमिनीवरील अतिक्रमण, धरणाच्या भिंतीचे सेफ्टी आॅडिट याकडे दुर्लक्ष केले जात आहे. इंग्रजांनी भारतामध्ये रेल्वे सेवा सुरू करण्यासाठी जून १८४५ मध्ये द ईस्ट इंडिया रेल्वे कंपनीची स्थापना केली. या कंपनीने सर्वेक्षण करून मुंबई ते दिघा पहिली रेल्वेसेवा सुरू करण्याचे निश्चित केले. रेल्वेसाठी मुबलक पाणी उपलब्ध व्हावे यासाठी दिघा परिसरातील इलठाण गावच्या हद्दीत धरण बांधण्यात आले. या धरणातून ठाण्यापर्यंत पाइपलाइन टाकण्यात आली. १८५३ मध्ये सुरू झालेल्या पहिल्या रेल्वे सेवेसाठीचा पाणीपुरवठा याच धरणातून करण्यात आला. स्वातंत्र्यापर्यंत धरणाचा वापर केला जात होता. परंतु यानंतर या पाण्याची रेल्वेला आवश्यकता नसल्याने त्याचा वापर बंद झाला. जवळपास १६० वर्षांपूर्वी बांधलेले हे धरण नवी मुंबईची निर्मिती झाल्यानंतरही दुर्लक्षित राहिले होते. यावर्षी भीषण दुष्काळ पडल्यामुळे दिघा धरणातील पाण्याचे महत्त्व सर्वांच्या लक्षात आले आहे. खासदार राजन विचारे यांनी रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेवून हे पाणी दिघा परिसराला मिळावे यासाठी पाठपुरावा केला. रेल्वेनेही तीन महिन्यांसाठी या पाण्याचा वापर करण्यास परवानगी दिली. आता या धरणातील पाणी ठाणे शहराला देण्याचीही घोषणा केली आहे. सोमवारी रेल्वेचे अधिकारी या धरणाची पाहणी करणार असून त्यानंतर याविषयी योग्य निर्णय घेतला जाणार आहे. दिघा धरणाच्या पाणी वापरापेक्षा त्याच्या श्रेयासाठीच सर्व राजकीय पक्षांची चढाओढ सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँगे्रसचे संजीव नाईक हे खासदार असताना त्यांनी सर्वप्रथम रेल्वे प्रशासनाकडे या धरणासाठी पाठपुरावा सुरू केला. धरण नवी मुंबई महापालिकेकडे हस्तांतर करण्यात यावे अशी मागणी केली होती. यासाठी सातत्याने अधिकाऱ्यांच्या बैठकाही घेतल्या होत्या. त्यांच्यानंतर खासदार राजन विचारे यांनी धरणातील पाणी या परिसरातील नागरिकांना मिळावे यासाठी पाठपुरावा केला. रेल्वे मंत्र्यांना निवेदन दिल्यानंतर त्यांनीही प्रशासनाला हे पाणी नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या आहेत. यानंतर शिवसेना व राष्ट्रवादीमध्ये श्रेय घेण्यासाठी धडपड सुरू झाली आहे. श्रेयाच्या वादामध्ये धरणाच्या भिंतीची मजबुती, धरण पायथ्याशी झालेले झोपड्यांचे अतिक्रमण, धरणाची सुरक्षितता या महत्त्वाच्या प्रश्नांकडे सर्वांनीच दुर्लक्ष केले आहे. भविष्यात धरणाच्या भिंतीला भगदाड पडले तर शेकडो झोपड्या वाहून जाण्याची शक्यता असून याकडे सर्वांनीच दुर्लक्ष केले आहे. > दिघा धरण क्षेत्रातील वास्तव चित्रधरणाच्या पायथ्याशी शेकडो झोपड्यांचे अतिक्रमण सॅटलाइट छायाचित्र असतानाही येथील अतिक्रमणावर कारवाई नाही६० वर्षांपूर्वी बांधलेल्या धरणाचे सेफ्टी आॅडिट केलेले नाहीब्रिटिशकालीन पाइपची चोरीधरणाच्या भिंतीजवळील लोखंडही कापून नेलेधरणाची भिंत कोसळल्यास मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी होणारधरणाचे पाणी वाहून नेणाऱ्या नाल्याच्या काठावरही अतिक्रमण धरणाच्या सुरक्षेसाठी काहीच यंत्रणा नाहीपाणी पिण्यायोग्य आहे का याचीही तपासणीही नाही जवळपास १६० वर्षांपूर्वी बांधलेल्या या धरणाच्या भिंतीला तडे > रेल्वेला पडला होता विसरदिघा येथील धरण रेल्वेच्या मालकीचे असले तरी या मालमत्तेकडे प्रशासनाने कधीच लक्ष दिले नाही. धरण परिसरातील जमिनीवर अतिक्रमण होवू नये यासाठीही काहीच उपाययोजना केलेल्या नाहीत. धरण सुरक्षित आहे की नाही हेही कधीच पाहिले नाही. रेल्वे मंत्र्यांच्या आदेशानंतर २५ एप्रिलला प्रशासन धरणाची पाहणी करणार असून आतातरी गांभीर्याने धरणाचा प्रश्न मार्गी लावणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.