शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

पनवेलच्या मतदारांची भूमिका निर्णायक ठरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 02:27 IST

लोकसभा निवडणुकीतील मावळ मतदार संघात सहा विधानसभा मतदार संघाचा समावेश आहे. मात्र, यात पनवेल, उरणमधील मतदारांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

- वैभव गायकर पनवेल : लोकसभा निवडणुकीतील मावळ मतदार संघात सहा विधानसभा मतदार संघाचा समावेश आहे. मात्र, यात पनवेल, उरणमधील मतदारांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे. पनवेल विधानसभेवर भाजपा तर उरण विधानसभेवर सेनेचा आमदार असल्याने आघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांना कसरत करावी लागणार आहे. गेल्या पाच वर्षांपासून बारणे यांनी पनवेल, उरण मतदार संघात जनसपंर्क ठेवल्याने येथील मतदारांना बारणे नवखे नाहीत. मात्र, थेट लोकसभेची उमेदवारी प्राप्त झाल्यानंतर राजकारणात उडी घेतलेले माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे मतदारांना नवखे आहेत.सर्वात मोठा मतदार संघ असलेल्या पनवेल महापालिकेवर सध्या भाजपाची एकहाती सत्ता आहे. या ठिकाणी राष्ट्रवादीचे केवळ दोन नगरसेवक आहेत. राष्ट्रवादीसोबत आघाडी केलेला शेकाप दुसऱ्या क्र मांकाचा पक्ष आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला शेकापवर अवलंबून राहावे लागणार आहे. पनवेल विधानसभा क्षेत्रात एकूण साडेपाच लाख मतदार आहेत, तर उरण विधानसभा क्षेत्रात तीन लाखांच्या आसपास मतदार आहेत. दोन्ही विधानसभा क्षेत्रातील मतदारांची संख्या जवळपास साडेआठ लाखांपर्यंत आहे. दोन्ही मतदार संघात युतीचे वर्चस्व असल्याने राष्ट्रवादीसमोर मोठे आव्हान आहे. या मतदार संघाला लागून असलेल्या कर्जत विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादीचे आमदार असल्याने राष्ट्रवादीसाठी जमेची बाजू आहे. मात्र, पनवेल, उरण या दोन मतदार संघात आघाडी घेण्यासाठी राष्ट्रवादीचा कस लागणार आहे.पनवेल मतदार संघात माजी खासदार रामशेठ ठाकूर यांचे वर्चस्व आहे. युती झाल्याने श्रीरंग बारणेंना विजयी करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. मावळ मतदार संघातील घाटमाथ्यावरील पिंपरी, चिंचवड व मावळ मतदार संघात राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मोठे वर्चस्व आहे. मात्र, त्या तुलनेने पनवेल, उरण मतदार संघात असे जाणवत नाही. युतीचे उमेदवार बारणे यांना पाच वेळा ‘संसदरत्न’ पुरस्काराने सन्मानित केले आहे. तर पार्थ पवार नवखे असले तरी राज्यातील प्रमुख राजकीय घराण्याचा वारसा त्यांच्या पाठीशी आहे. त्यामुळे मावळमधील प्रमुख पक्षांच्या दोन्ही उमेदवारांचा निवडणुकीत कस लागणार आहे.२२ लाख लोेकसंख्यामावळ लोकसभा मतदार संघ हा राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा मतदार संघ आहे. राज्यात ठाणे लोकसभा मतदार संघ सर्वात मोठा आहे. या मतदार संघाची संख्या २३ लाखांपेक्षा जास्त आहे. त्यापाठोपाठ मावळ लोकसभा मतदार संघ राज्यातील दुसरा सर्वात मोठा मतदार संघ आहे. या मतदार संघात मतदारांची संख्या २२ लाखांपेक्षा जास्त आहे.

टॅग्स :panvelपनवेल