शहरं
Join us  
Trending Stories
1
शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
2
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
3
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
4
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
5
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
6
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
7
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
8
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
9
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
10
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
11
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
12
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
13
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
14
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
15
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
16
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
17
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
18
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
19
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
20
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!

महामार्गावरील लुटारूंना अटक

By admin | Updated: February 6, 2015 23:06 IST

पश्चिम महामार्गावर कारमध्ये लिफ्ट देऊन प्रवाशांना लुटणाऱ्या तीन जणांना पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेजवरून मागोवा काढत मुंबईतील विविध ठिकाणांहून अटक केली आहे.

भार्इंदर : पश्चिम महामार्गावर कारमध्ये लिफ्ट देऊन प्रवाशांना लुटणाऱ्या तीन जणांना पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेजवरून मागोवा काढत मुंबईतील विविध ठिकाणांहून अटक केली आहे. महामार्गावर अनेक प्रवाशांना लिफ्ट देऊन लुटण्याच्या घटना काशिमीरा पोलिसांच्या हद्दीत घडल्या असल्या तरी अनेक प्रवाशांच्या हत्येचे प्रकारही घडले आहेत. हे लुटारू गरजू प्रवाशांना हेरून त्यांना लिफ्ट देतात. पुढे एखाद्या निर्मनुष्य ठिकाणी त्यांना लुटून सोडून दिले जाते. लुटारूंना विरोध केल्यास प्रसंगी त्या प्रवाशाची हत्या करून अथवा त्याला जबर जखमी केले जाते. असाच प्रकार काशिमीरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत २ फेब्रुवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडला. घोडबंदर रोडवरील काजूपाडामध्ये दत्त मंदिराजवळील शिवशक्ती सोसायटीतील रूम नं. ए/३ मध्ये राहणाऱ्या राजेश नारायण मिश्रा (३३) यांनी मध्यरात्रीच्या सुमारास काशिमीरा परिसरातून काजूपाडा येथील घरी जाण्यासाठी एक खाजगी कार थांबविली. त्यात चालकासह दोन प्रवासी अगोदरच बसले होते. मिश्रा यांना कारमध्ये बसविण्यात आले. कार निघाल्यानंतर ती वर्सावे परिसरातील निर्मनुष्य ठिकाणी थांबविण्यात आली. त्यातील चालकासह त्या दोन प्रवाशांनी मिश्रा यांच्याकडील साडेसहा हजारांची रोकड लुटून त्यांच्या मानेवर धारदार शस्त्राने इजा करून जखमी अवस्थेत तेथेच सोडून पोबारा केला. याप्रकरणी मिश्रा यांनी काशिमीरा पोलिसांत ५ फेब्रुवारी रोजी तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी घटनेचा मागोवा घेण्यास सुरुवात केली असता परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेज तपासण्यास सुरुवात केली. त्यात घटनेच्या वेळी वापरण्यात आलेल्या कारच्या क्रमांकावरून पोलिसांनी आरोपींचा मागोवा घेत त्यांना मुंबईच्या वडाळा व अ‍ॅन्टॉप हिल परिसरातून अटक केली आहे. आरोपींमध्ये मेहताब अली शराफत अली खान (३०) रा. २८१, म्हाडा ट्रान्झिट कॅम्प, कोकणी आगार, ९० फुटी रोड, वडाळा टीटी, मुंबई, मोहम्मद इफ्तिखार मोहम्मद मुश्ताक खान (२९) रा. २, हिम्मतनगर, म्हाडा बि. क्र. ५ च्या बाजूला, मराठा चाळीजवळ, अ‍ॅन्टॉप हिल, मुंबई व जीवन दयाराम राजभर (३०) रा. संगमनगर, पाटील चाळीसमोर, वडाळा, मुंबई यांचा समावेश असून त्यांनी मुंबईसह इतर ठिकाणी अशा प्रकारचे गुन्हे केल्याचा अंदाज पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजेंद्र कांबळे यांनी व्यक्त केला आहे. (प्रतिनिधी)