शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
3
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
4
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
5
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
6
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
7
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
8
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश
9
११३९ कोटी कधी मिळणार? १६ लाख शेतकरी अजून बँकांच्या केवायसीत अडकलेले
10
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
11
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
12
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
13
एमबीबीएस प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ; निकालापूर्वीच बीएएमएस, बीएचएमएस प्रवेश फेरी सुरू
14
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
15
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
16
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
17
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
18
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
19
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
20
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा

रस्ते, पदपथांवर होणार ६३४ कोटी रुपये खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2020 00:05 IST

अर्थसंकल्पात १५४ कामांचा समावेश : एमआयडीसीलाही प्राधान्य

नामदेव मोरे 

नवी मुंबई : महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पातील तब्बल ६३४ कोटी रुपये अडथळामुक्त रस्ते व पदपथ बांधण्यासाठी खर्च करण्यात येणार आहेत. एमआयडीसीमधील रस्त्यांसाठीही २२८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पामबीच रस्त्याला लागून सायकल ट्रॅकही प्रस्तावित केला आहे.नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी अर्थसंकल्पात मोठ्या प्रकल्पांऐवजी अत्यावश्यक सुविधांना प्राधान्य दिले आहे.

शहरवासीयांना अडथळामुक्त रस्ते व पदपथ उपलब्ध व्हावेत यावर लक्ष केंद्रित केले आहे. सर्वाधिक खर्च या कामांसाठी होणार आहे. वास्तविक महापालिकेच्या प्रत्येक अर्थसंकल्पात या कामांना झुकते माप दिले जाते. कोट्यवधी रुपये खर्च करण्यात येतात. नागरिक व लोकप्रतिनिधींकडूनही याच कामांची मागणी असते. मागील काही वर्षांमध्ये अडथळामुक्त पदपथांना प्राधान्य दिले जात आहे. पण प्रत्यक्षात अनेक पदपथांचा चालण्यासाठी वापरच करता येत नाही.काही ठिकाणी पदपथांवर फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे. यामुळे सर्व खर्च व्यर्थ जात आहे. शहरातील रस्त्यांचे काम व मलनि:सारण वाहिनी, जलवाहिनी, मोबाइल कंपन्या व इतर कंपन्यांचे काम यामध्ये समन्वय नसतो. यामुळे महापालिका रस्ता बनविते. मात्र बनविलेला रस्ता विविध कारणांसाठी खोदला जातो व पुन्हा तोच रस्ता बनविण्यासाठी लाखो रुपये खर्च करावे लागतात. या वर्षी बेलापूर, नेरूळ, वाशी, तुर्भे, सानपाडा, घणसोली, दिघा व एमआयडीसी परिसरात तब्बल १५४ कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. त्यासाठी ६३४ कोटी ३१ लाख रुपयांची तरतूद केली आहे. स्थायी समिती व सर्वसाधारण सभेमध्ये या कामांमध्ये अजून वाढ होण्याची शक्यता आहे.

पामबीच रोड हा शहरातील सर्वांत महत्त्वाचा रस्ता आहे. या रस्त्याला लागून सायकल ट्रॅक बनविणे प्रस्तावित आहे. या कामासाठी १९ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. पालिकेने यापूर्वी तुर्भे व वाशीमधील महत्त्वाच्या रस्त्यांचे काँक्रिटीकरण केले आहे. पुढील वर्षभरामध्ये नेरूळ परिसरातील महत्त्वाच्या रस्त्यांचे काँक्रिटीकरण केले जाणार असून त्यासाठी ९५ कोटींची तरतूद केली आहे. ठाणे - बेलापूर औद्योगिक वसाहतीमधील कामांनाही प्राधान्य देण्यास सुरुवात केली आहे. या परिसरामध्ये अवजड वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. यामुळे सर्व प्रमुख रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचे काम सुरू आहे. काही कामे पूर्ण झाली असून काही सुरू आहेत. शिल्लक कामे पुढील वर्षभरामध्ये पूर्ण केली जाणार असून त्यासाठी जवळपास २२८ कोटी खर्च होणार आहेत.रस्ते व पदपथांच्या कामांचा तपशीलविभाग प्रस्तावित कामे अपेक्षित खर्च (कोटी)बेलापूर २९ ३९.१९नेरूळ ६ १३७वाशी ४९ ८१.०८तुर्भे, सानपाडा ३४ ४०.४८घणसोली १२ २२.४१दिघा, ऐरोली ११ ८५.१७एमआयडीसी १३ २२८.९४प्रत्यक्ष पाहणी व्हावीमहापालिकेने अडथळामुक्त पदपथ या उपक्रमाअंतर्गत कोट्यवधी रुपये खर्च करून पदपथ तयार केले आहेत. परंतु अनेक ठिकाणी पदपथांवर गॅरेज, फेरीवाले व इतर व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे. पदपथांचा वापर चालण्यासाठी होत नसल्याने पालिकेचा खर्च व्यर्थ गेला आहे. प्रशासनाने यापूर्वी केलेल्या कामांचे सर्वेक्षण करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईroad safetyरस्ते सुरक्षा