शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

रस्ते महामंडळाकडील ‘ती’ ११ गावे नैनाकडे

By admin | Updated: April 14, 2016 00:22 IST

खालापूर तालुक्यातील ११ गावे पुन्हा सिडकोच्या नैना प्रकल्पात वर्ग करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय नगरविकास विभागाने घेतला आहे. राज्य शासनाने खालापूर व पनवेल तालुक्यातील ८४ गावांचे २00 चौरस

- कमलाकर कांबळे,  नवी मुंबई खालापूर तालुक्यातील ११ गावे पुन्हा सिडकोच्या नैना प्रकल्पात वर्ग करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय नगरविकास विभागाने घेतला आहे. राज्य शासनाने खालापूर व पनवेल तालुक्यातील ८४ गावांचे २00 चौरस किलोमीटरचे क्षेत्र नियोजनासाठी रस्ते विकास महामंडळ अर्थात एमएसआरडीसीकडे वर्ग केले आहे. त्यामुळे नैना योजनेअंतर्गत प्रस्तावित असलेल्या खालापूर स्मार्ट सिटीचा प्रकल्प रखडण्याची शक्यता निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर सिडकोने नगरविकास विभागाकडे आक्षेप नोंदविला होता. त्यानुसार राज्य शासनाने खालापूर स्मार्ट सिटी प्रकल्पात समावेश असलेली ‘ती’ ११ गावे पुन्हा नैनाकडे वर्ग करण्याचा निर्णय घेतला आहे.नवी मुंबई विमानतळ प्रभावित क्षेत्रातील २७० गावांतील सुमारे ६०० चौरस किलोमीटर क्षेत्राचे नियोजन प्राधिकरण म्हणून राज्य सरकारने सिडकोवर जबाबदारी सोपविली आहे. त्यानुसार सिडकोने नैना प्राधिकरणाची स्थापना केली आहे. त्या माध्यमातून नैना प्रकल्पाचा टप्प्याटप्प्याने विकास करण्याची योजना सिडकोने आखली आहे. पहिल्या टप्प्यात पनवेल तालुक्यातील २३ गावांचा समावेश केला आहे, तर दुसऱ्या टप्प्यात समावेश असलेल्या खालापूर शहराचा स्मार्ट सिटीच्या धर्तीवर विकास करणार आहे. त्यानुसार ११ गावांचे एकत्रित प्रतिनिधित्व करणाऱ्या खालापूर नगरपंचायत, कलोटे मोकाशी ग्रामपंचायत आणि नादोडे ग्रामपंचायतीने नैना योजनेअंतर्गत ३५५0 हेक्टर जमिनीच्या लँड पुलिंगला संमती दिली आहे. गेल्या महिन्यात राज्य शासनाने प्रस्तावित स्मार्ट सिटीतील या ११ गावांसह खालापूर तालुक्यातील ८४ गावांच्या नियोजनाची जबाबदारी एमएसआरडीसीवर सोपविली होती. सिडकोच्या आक्षेपानंतर नगरविकास विभागाने खालापूर, महाड, शिरवली, निंबोडे, वडवे, नादोडे, निगडोली, कलोटे मोकाशी, कलोटे रयाती, विणेगाव आणि कंद्रोली टर्फ ही अकरा गावे पुन्हा नैनाकडे वर्ग केली आहेत. प्रस्तावित पनवेल महापालिकेत खारघर नाहीप्रस्तावित पनवेल महापालिकेत सिडको नोडसह पनवेल तालुक्यातील जवळपास ७0 गावे समाविष्ट केली जाणार आहेत. तथापि नैनाच्या पहिल्या टप्प्यात समावेश असलेली २३ गावे प्रस्तावित महापालिकेत वर्ग करण्यास सिडकोने विरोध दर्शविला आहे. त्याचप्रमाणे खारघर नोडचा प्रस्तावित महापालिकेत समावेश करण्यासही सिडकोचा विरोध आहे. सिडकोने यासंदर्भातील आपला आक्षेप कोकण विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील अभ्यास समितीकडे नोंदविला आहे. कळंबोली, कामोठे, काळुंद्रे आणि पनवेल नगर परिषदेचे क्षेत्र प्रस्तावित पनवेल महापालिकेत समाविष्ट करावे, अशी सूचनाही सिडकोने अभ्यास समितीला केली आहे. पूर्वनियोजित प्रकल्पांना धक्का लागणार असेल तर नक्कीच आक्षेप घेतला जाईल. नैना योजनेअंतर्गत विकास होणाऱ्या खालापूर स्मार्ट सिटीतील ११ गावे रस्ते विकास महामंडळाकडे देण्यात आली होती. त्यावर आक्षेप नोंदविल्याने ही गावे नैना क्षेत्राकडे वर्ग करण्यात आली आहेत.- व्ही. राधा, सह व्यवस्थापकीय संचालिका, सिडको