शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

ओव्हरलोड वाहनांमुळे अपघाताचा धोका 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 23:48 IST

उलवेतील रहिवासी त्रस्त : वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क नवी मुंबई : मालवाहतूक वाहनांमधून होणारी ओव्हरलोड वाहतूक अपघातांना निमंत्रण देणारी ठरत आहे. अशातच उलवे परिसरातील रहिवासी भागातून ही वाहने भरधाव वेगात जात असल्याने रहिवासी त्रस्त आहेत. परंतु, तक्रार करूनदेखील कारवाईकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे.उलवे परिसरातून मोठ्या प्रमाणात जड-अवजड वाहनांची वाहतूक वाढली आहे. त्यात बांधकामाचे साहित्य वाहतूक करणाऱ्या वाहनांचा सर्वाधिक समावेश आहे. मात्र, ही वाहतूक करताना डम्परमधून क्षमतेपेक्षा जास्त माल भरला जात आहे. शिवाय, नियमांचे उल्लंघन करून वाहतूक केली जाणारी खडी, माती, दगड बंदिस्त करण्याकडेही दुर्लक्ष होत आहे. परिणामी, परिसरात धूलिकण पसरून मोठ्या प्रमाणात वायुप्रदूषण होत आहे. याचा नाहक त्रास ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे उघडपणे नियमांची पायमल्ली करून सुरू असलेल्या वाहतुकीला आळा घालण्याची मागणी उलवेतील सिडको प्रकल्पग्रस्त हक्कप्राप्ती समितीचे अध्यक्ष कृष्णा पाटील यांनी वाहतूक पोलीस व आरटीओकडे केली होती. मात्र, तक्रार केल्यानंतर केवळ चौकशी करून प्रत्यक्षात कारवाईकडे दुर्लक्ष होतअसल्याचा आरोप केला आहे.

रस्त्यांची दयनीय अवस्थाक्षमतेपेक्षा जास्त माल भरून धावणाऱ्या डम्परमुळे परिसरातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी गटारांची झाकणे तुटली आहेत. त्यामुळे सुविधांवरदेखील त्याचा परिणाम उमटत आहे. तर, ही मालवाहतूक कुठून कुठे होते, याचादेखील उलगडा अद्याप झालेला नसून आवश्यक कागदपत्रेदेखील वाहनचालकांकडे नसतात. त्यामुळे उल्वेवासीयांच्या जीविताला धोकादायक ठरणारी ओव्हरलोड वाहतूक तत्काळ बंद करावी, अशी मागणी होत आहे.