शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

संघटनेच्या वादातून रिक्षाचालकांचा राडा, खारघरमध्ये रिक्षांची तोडफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 02:40 IST

खारघर शहरात रिक्षाचालकांमध्ये झालेल्या हद्दीच्या वादावादीचे रूपांतर हाणामारीत झाल्याने मंगळवारी शहरात मोठा राडा झाला.

पनवेल : खारघर शहरात रिक्षाचालकांमध्ये झालेल्या हद्दीच्या वादावादीचे रूपांतर हाणामारीत झाल्याने मंगळवारी शहरात मोठा राडा झाला. खारघर आणि तळोजा शहरातील रिक्षाचालक आपआपसांत भिडल्याने अनेक रिक्षांची तोडफोड झाली आहे. दोन्ही गटांतील रिक्षाचालक मारहाणीत गंभीर जखमी झाले आहेत.खारघर शहरात एकता रिक्षा संघटना ही एकमेव अधिकृत रिक्षा संघटना आहे. शहराचा विस्तार झाल्याने जवळच असलेल्या तळोजा किंवा खारघर शहरातील प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असते. दोन्ही शहरात स्वतंत्र अशा रिक्षा संघटना अस्तित्वात आहेत. या वाहतुकीदरम्यान खारघरमधील संघटनेचे रिक्षाचालक व तळोजामधील रिक्षाचालकांमध्ये सतत वाद होत असतो. मंगळवारी सकाळी ११ च्या दरम्यान दोन्ही संघटनांच्या पदाधिकाºयांचा वाद खारघर रेल्वे स्थानकावर झाला. या वादावादीचे रूपांतर हाणामारीत झाल्याने अनेक रिक्षाचालक जखमी झाले. विशेष म्हणजे तळोजा येथील रिक्षा चालकांनी आपल्या रिक्षात पूर्वतयारीनिशी दगड-धोंडे भरून आणले असल्याचा आरोप एकता रिक्षा संघटनेचे पदाधिकारी अ‍ॅडव्होकेट सचिन कांबळे यांनी केला. तळोजा रिक्षा संघटनेच्या पदाधिकाºयांनी देखील या वेळी खारघर रिक्षा संघटनेवर मनमानीचा आरोप केला. या वेळी मोठ्या प्रमाणात दगडफेक झाल्याने प्रवाशांमध्ये देखील भीतीचे वातावरण होते. विशेष म्हणजे खारघर रेल्वे स्थानकाजवळील प्रवासी वाहतूक देखील काही काळासाठी बंद असल्याने प्रवाशांचे मोठे हाल झालेले या वेळी पाहावयास मिळाले. याठिकाणी मध्यस्थी करीत असलेल्या पोलिसांना देखील दगड लागला असल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेची नोंद खारघर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. जखमी झालेल्या रिक्षाचालक महेंद्र कोळी यांना गंभीर दुखापत झाली असून, त्यांच्यावर नेरूळ येथील डी.वाय. पाटील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यासंदर्भात खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप काळे यांनी, दोघांनी एकमेकांविरोधात तक्र ार दाखल केली आहे, दोघांनी आपआपसात हा वाद मिटवून व्यवसाय करावा. यासंदर्भात दोन्ही संघटनेच्या पदाधिकाºयांसोबत बैठक घेऊन आवश्यक सूचना यापूर्वीच दिल्या असल्याचे सांगितले.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई