शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

घंटागाड्यांवर जीपीएससह आरएफआयडीची नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 23:35 IST

कचरा वाहतुकीसाठी ११९ वाहनांचा वापर सुरू आहे.

नवी मुंबई:  घनकचरा व्यवस्थापनामध्ये नवी मुंबई पालिकेला देशात प्रथम क्रमांक मिळाला आहे. कचरा वाहतुकीमध्ये पारदर्शीपणा आणण्यासाठी जीपीएससह आरएफआयडीचा वापर होतो आहे. नवी मुंबई पालिका कार्यक्षेत्रामध्ये प्रतिदिन सरासरी ७२० टन कचरा निर्मिती होते. वाहतूक करण्यासाठी ठेकेदाराची नियुक्ती केली आहे.

कचरा वाहतुकीसाठी ११९ वाहनांचा वापर सुरू आहे.  ही वाहने नेमून दिलेल्या मार्गावरून व नेमून दिलेल्या वेळेत धावत आहेत का, याची माहिती  घेण्यासाठी वाहनांना जीपीएस यंत्रणा बसविण्यात आली आहे. याशिवाय कोणत्या कचरा कुंडीतील कचरा किती वाजता उचलण्यात आला, हे पाहण्यासाठी रेडीओ फ्रीक्वेन्सी आयडेंटिफिकेशन डिव्हायस (आरएफआयडी ) बसविण्यात आला आहे. या माध्यमातून कचरा वाहतुकीवर लक्ष ठेवले जात आहे. 

प्रत्येक वाहनावर ठेवले जाते लक्ष 

घनकचरा विभागातील प्रत्येक वाहनावर जीपीएस व आरएफआयडी च्या माध्यमातून लक्ष ठेवले जात आहे. नियंत्रण कक्षातून कोणती गाडी कुठे आहे व सर्व कचराकुंडीतील कचरा उचलला जात आहे का, यावर लक्ष ठेवले जात आहे. 

नियमांचे उल्लंघन होत असल्याचे लक्षात आल्यानंतर तत्काळ संबंधितांवर दंडही आकारण्यात येत आहे, याशिवाय नागरिकांनी काही तक्रारी केल्यास त्याचीही वेळेत दखल घेतली जात असून, संबंधितांना वाहनांची दुरूस्ती व इतर कामे करण्यास सांगितले जात आहे. ही वाहने नेमून दिलेल्या मार्गावरून व नेमून दिलेल्या वेळेत धावत आहेत का, या माहितीसाठी जीपीएस यंत्रणा आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई