उरण : 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिका:यांना o्रध्दांजली म्हणून जेएनपीटी कामगार एकता संघटनेने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिर, देशभरातील 63क् क्रांतिकारकांच्या छायाचित्रंचे प्रदर्शन आणि माधवबागचे डॉक्टर ओमकार चौधरी यांचे हृदयविकार आणि आपण अशा तिहेरी कार्यक्रमाला जेएनपीटीचे कामगार अधिकारी, कामगारांचे कुटुंबीय आणि शाळकरी विद्यार्थी यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या कार्यक्रमाचे उद्घाटन जेएनपीटीचे चेअरमन एन.एन.कुमार यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपीठावर शिबेन कौल, सहाय्यक पोलीस आयुक्त शशिकांत बोराटे, कमांडंट अमित सारंग, विंग कमांडट राव, डॉ. हिंगोराणी, अॅड.विजय पाटील आदि उपस्थित होते. यावेळी दिनेश पाटील यांनी कामगार एकता संघटनेच्या या चांगल्या उपक्रमाचे स्वागत करून 26/11च्या हल्ल्याच्या आठवणी ताज्या करतानाच जेएनपीटी च्या कामगारांचा असे उपक्रम राबवित असल्याबद्दल आपल्याला सार्थ अभिमान असल्याचे सांगितले.
कामगार संघटनेच्या सदस्यांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात दिवसभरात 176 जणांनी रक्तदान केले आहे. यावेळी भरविण्यात आलेल्या क्रांतिकारकांच्या छायाचित्रंच्या प्रदर्शनातून भावी पिढीला प्रेरणा मिळेल, असे गौरवोद्गार शिबेन कौल यांनी काढेल. या छायाचित्रंमध्ये कधीही माहीत नसलेल्या अनेक क्रांतिकारकांची छायाचित्रेही पहायला मिळाल्याने विद्यार्थी आणि पाहुणोही भारवल्याचे दिसत होते.
26/11 ला अतिरेकी कसाब आणि त्याचे सहकारी मुंबईत कशाप्रकारे शिरले याबाबतचा व्हिडीयो दाखविण्यात आला. या कार्यक्रमात दहा अनाथ विद्याथ्र्याना साहित्याचे वाटप पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. तर माधवबागचे डॉक्टर ओमकार चौधरी यांनी दिलेल्या व्याख्यानालाही नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद देऊन हृदयरोग टाळण्यासाठीच्या छोटय़ा छोटय़ा टिप्स ऐकून घेतल्या. क्रांतिकारकांच्या छायाचित्रंचे प्रदर्शन भरवून शहिदांना अनोखी आदरांजली दिल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.