शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

फिफाच्या पूर्वतयारीचा आढावा , पालिका मुख्यालयात आयुक्तांची बैठक : सुशोभीकरणासह सर्व कामांसाठी सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 03:27 IST

नेरूळ येथील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये होणा-या १७ वर्षांखालील फिफा वर्ल्डकप स्पर्धेसाठीच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी पालिका आयुक्तांनी विशेष बैठकीचे आयोजन केले होते.

नवी मुंबई : नेरूळ येथील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये होणाºया १७ वर्षांखालील फिफा वर्ल्डकप स्पर्धेसाठीच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी पालिका आयुक्तांनी विशेष बैठकीचे आयोजन केले होते. बैठकीस एमएसआरडीसी, सिडको, पोलीस व इतर आस्थापनांचे अधिकारी उपस्थित होते. शहरात करण्यात येणारी सुशोभीकरणाची व इतर सर्व कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी करण्यात आल्या आहेत.फुटबॉल विश्वचषकासाठी जगभरातील क्रीडाप्रेमी नवी मुंबईमध्ये येणार आहेत. डी. वाय. पाटील मैदानामध्ये ६, ९ व १२ आॅक्टोबरला प्रत्येकी दोन व १८ आॅक्टोबरला राऊंड आॅफ सिकस्टीन, २५ आॅक्टोबरला उपांत्य फेरीचा सामना होणार आहे. प्रत्येक सामना पाहण्यासाठी किमान ४० ते ४५ हजार क्रीडा रसिक उपस्थित राहणार आहेत. याशिवाय राजकीय, उद्योग व इतर क्षेत्रामधील अनेक दिग्गज मान्यवरही मॅचेस पाहण्यासाठी येणार आहेत. या निमित्ताने नवी मुंबईचे नाव विश्वभर झळकणार असल्याने स्पर्धेसाठीची जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे.नेरूळ सेक्टर १९ मधील यशवंतराव चव्हाण क्रीडांगणाच्या कामाची माहिती घेण्यात आली. मैदानाचे काम अंतिम टप्प्यात आले असून ते लवकरच पूर्ण केले जाणार आहे. वाशीमधील एनएमएसए मैदानामध्येही सराव सामने होणार असून तेथील तयारीचीही माहिती घेण्यात आली.स्पर्धेच्या दिवशी वाहतूककोंडी होवू नये यासाठी वाहनतळाची विशेष व्यवस्था करण्यात यावी. पार्किंग स्थळावरून स्टेडियमकडे ये - जा करण्यासाठी पुरेशा बसेस उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही करण्यात आल्या.सरावाच्या व स्पर्धेच्या वेळी पुरविण्यात येणाºया आरोग्य सेवेचा आढावा घेताना यशवंतराव चव्हाण क्रीडांगणाच्या ठिकाणी नवी मुंबई महापालिका आरोग्य विभागाच्यावतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. एनएमएसए वाशी मैदानाच्या ठिकाणी एमजीएम रुग्णालय वाशी व नेरूळमध्ये डी.वाय. पाटील रुग्णालयाच्यावतीने वैद्यकीय पथक उपलब्ध करून देण्यात येणार आहे.यशवंतराव चव्हाण क्रीडांगणाच्या ठिकाणी अग्निशमन वाहने व जवान तैनात केले जाणार आहेत. शहरात सुरू करण्यात येणाºया शटल बस सेवेच्या पार्किंगची व्यवस्था एनएमएमटी प्रशासनाने करण्याच्या सूचना यावेळी करण्यात आल्या. यावेळी अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण, रमेश चव्हाण, मोहन डगावकर, संदीप संगवे, नितीन पवार व इतर अधिकारी उपस्थित होते.