शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

आपत्कालीन यंत्रणेचा आढावा

By admin | Updated: May 11, 2017 02:16 IST

आपत्ती टाळण्याच्या दृष्टीने सर्व यंत्रणांनी सतर्क राहावे, तसेच मान्सूनपूर्व कोकण विभागातील शासकीय यंत्रणेच्या तयारीचा आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : आपत्ती टाळण्याच्या दृष्टीने सर्व यंत्रणांनी सतर्क राहावे, तसेच मान्सूनपूर्व कोकण विभागातील शासकीय यंत्रणेच्या तयारीचा आढावा घेण्याकरिता मंगळवारी बेलापूर येथील कोकण विभागीय कार्यालयात जिल्हानिहाय आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीदरम्यान मार्गदर्शन करताना आपत्कालीन परिस्थितीशी सामना करण्यासाठी आराखडा तयार करावा. तसेच सर्व जिल्ह्यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागात आवश्यक ती माहिती अद्ययावत करावी, असे निर्देश उपायुक्त भाऊसाहेब दांगडे यांनी दिले. कोकण विभागातील सर्व नियंत्रण कक्ष २४ तास सुरु ठेवून जेथे जेथे आवश्यक असेल तेथे कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात यावी. तसेच आपत्ती काळात तत्काळ मदत करु न आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने सर्वांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन उपायुक्त यांनी केले आहे. अवेळी पावसाने विजा पडण्याचे प्रमाण वाढले आहे. वीज कोसळल्याने मनुष्यहानीसह वित्तहानीही मोठ्या प्रमाणात होत आहे. या दृष्टीने विभागात बसविण्यात आलेले वीजरोधक सुस्थितीत आहे किंवा नाही हे त्वरित पाहण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.पावसाळ्यात बऱ्याचदा कोकण रेल्वेच्या मार्गात दरडी कोसळण्याचे प्रकार घडतात. त्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. या बैठकीस प्रभारी जिल्हाधिकारी मुंबई शहर बन्सी गवळी, रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश नार्वेकर, निवासी उपजिल्हाधिकारी सिंधुदुर्ग विजय जोशी, निवासी उपजिल्हाधिकारी ठाणे, वंदना सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त नवी मुंबई महानगरपालिका अंकुश चव्हाण, मीरा -भार्इंदर महानगरपालिका उपायुक्त दीपक पुजारी, वसई - विरार महानगरपालिका उपायुक्त अजीज शेख, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका उपायुक्त धनाजी तोरस्कर आदी उपस्थित होते. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, तसेच मुंबई शहर, मुंबई उपनगर जिल्ह्यातील अधिकारी उपस्थित होते.