शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

इंडियन एअरलाइन्सची जमीन घेणार परत, नेरूळमधील 20 एकरचा भूखंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 02:39 IST

नवी मुंबई : इंडियन एअरलाइन्सला नेरूळ सेक्टर २७ येथे देण्यात आलेला सुमारे २0 एकरचा भूखंड परत घेण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे.

- कमलाकर कांबळे नवी मुंबई : इंडियन एअरलाइन्सला नेरूळ सेक्टर २७ येथे देण्यात आलेला सुमारे २0 एकरचा भूखंड परत घेण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. मागील अनेक वर्षांपासून हा भूखंड वापराविना पडून आहे. त्यामुळे तो परत घेऊन त्याची विक्री करण्याचे सिडकोने ठरविले आहे. सध्याच्या बाजारभावाप्रमाणे या भूखंडाची किंमत पाचशे कोटी रुपयांच्या घरात आहे.सिडकोने विविध शासकीय संस्थांसाठी मोठ्या प्रमाणात जमीन आरक्षित करून ठेवली आहे. परंतु या संस्थांनी वर्षानुवर्षे या भूखंडांचा ताबा न घेतल्याने शेकडो एकर जमीन वापराविना पडून आहे. या भूखंडांवर ठिकठिकाणी अतिक्रमण झाले आहे, तर काही भूखंडांवर खारफुटीची जंगले वाढली आहेत. वापराविना पडून असलेले शेकडो कोटी रुपयांचे हे भूखंड परत घेण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. त्यानुसार इंडियन एअरलाइन्सला नेरूळ सेक्टर २७ मध्ये दिलेला सुमारे वीस एकरचा भूखंड परत घेण्याची प्राथमिक कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. अगदी मोक्याच्या ठिकाणी असलेला हा भूखंड गेली अनेक वर्षे वापराविना पडून आहे. त्यामुळे त्यावर जंगल वाढले आहे, तर भूखंडांच्या एका मोठ्या भागाचे तळ्यात रूपांतर झाले आहे. पावसाचे पाणी साचून तयार झालेल्या कृत्रिम या तळ्यात मोठ्या प्रमाणात गाळ व घनकचरा साचला आहे. या घाणीत कमळे फुलली आहेत. तसेच तळ्याच्या काठावर बांगलादेशीयांनी झोपड्या उभारल्या आहेत.विशेष म्हणजे इंडियन एअरलाइन्सने हा भूखंड नको असल्याचे अलीकडेच सिडकोला कळविले आहे. त्यामुळे शेकडो कोटी रुपयांचा भूखंड भूमाफियांच्या घशात जाण्याअगोदर त्याचा रीतसर ताबा घेण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. त्यानुसार प्राथमिक कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. भूखंडाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर भराव टाकून हे तळे बुजविण्यात येणार आहे. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.>ओएनजीसीला दिलेल्या ४७ हेक्टर जागेवरही टाचपनवेलमधील काळुंद्रे येथे ओएनजीसीला कर्मचारी निवासस्थान उभारण्यासाठी तीस वर्षांपूर्वी दिलेला ४७ हेक्टरचा भूखंडही परत घेण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. मात्र कवडीमोलाच्या भावात मिळालेली सुमारे अडीच हजार कोटी रुपयांची जमीन हातची जाऊ नये, यासाठी ओएनजीसीने आटापिटा सुरू केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून ओएनजीसीने सिडकोच्या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. याप्रकरणी सिडकोने शुक्रवारी न्यायालयात आपले प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. ओएनजीसीने जागेचा गैरवापर केला आहे. तसेच करारनाम्यातील अटी व शर्तीचाही भंग करण्यात आला आहे. त्यामुळे सदर जागा परत घेण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू करण्यात आल्याचे सिडकोने या प्रतिज्ञापत्राद्वारे स्पष्ट केले आहे.>नेरूळच्या भूखंडाची निविदा काढून करणार विक्रीनेरूळ सेक्टर २७ येथे एअर इंडिया कॉलनीच्या शेजारी इंडियन एअरलाइन्ससाठी आरक्षित ठेवलेला सुमारे ६.५ हेक्टरचा भूखंड परत घेऊन निविदा प्रक्रियेद्वारे त्याची विक्री करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. सध्याच्या बाजारभावाप्रमाणे या भूखंडाची किंमत पाचशे कोटी रुपयांच्या घरात आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई