शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
2
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
3
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
4
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
5
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल
6
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
7
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
8
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
9
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
10
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
11
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
12
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
13
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
14
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
15
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
16
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
17
लय मोठा विषय चाललाय! चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशला एकाचवेळी झटका; भारतीय सैन्य काय करतंय?
18
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!
19
बिहार निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? बड्या नेत्याने दिले सूचक संकेत
20
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...

विमानतळाचे काम पुन्हा सुरू, सशर्त परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2020 02:09 IST

कमलाकर कांबळे  नवी मुंबई : लॉकडाउनमुळे मागील दीड महिन्यापासून बंद पडलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाला पुन्हा सुरुवात केली ...

कमलाकर कांबळे नवी मुंबई : लॉकडाउनमुळे मागील दीड महिन्यापासून बंद पडलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाला पुन्हा सुरुवात केली आहे. यासंदर्भात नवी मुंबई पोलिसांनी संबंधित कंत्राटदारांना सशर्त परवानगी दिली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने जारी केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे, असे निर्देश कंत्राटदारांना देण्यात आले आहेत. त्यानुसार अलीकडेच उलवे टेकडीचे खोदकाम आणि खडक फोडण्याच्या कामाला सुरुवात केली.नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा देशाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. सिडकोच्या माध्यमातून या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे काम हाती घेण्यात आले आहे. २0२२ पर्यंत विमानतळाचा पहिला टप्पा पूर्ण करण्याचा निर्धार सिडकोने केला आहे. त्यानुसार प्राथमिक स्तरावरील कामांचा धडाका सुरू करण्यात आला आहे. परंतु कोरोनामुळे जाहीर केलेल्या लॉकडाउनमुळे विमानतळाच्या कामाला खो बसला आहे. असे असले तरी काही अटी व नियमांच्या अधारे बंद पडलेल्या विविध प्रकल्पांची कामे पुन्हा सुरू करण्याची अनुमती केंद्र शासनाने दिली आहे. त्यानुसार सिडकोने विमानतळाच्या कामाला पुन्हा गती दिली आहे. उलवे नदीचा प्रवाह बदलण्याचे काम यापूर्वीच पूर्ण झाले आहे. सध्या विमानतळ परिसरातील उलवे टेकडी आणि खडक फोडण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. परंतु लॉकडाउनमुळे ही कामे ठप्प पडली होती. ही कामे सुरू करण्यासाठी संबंधित दोन कंत्राटदारांना नवी मुंबई पोलिसांनी सशर्त परवानगी दिली.>कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने जारी केलेल्या आदेशाचे काटेकोरपणे पालन करावे. कामगारांच्या आरोग्याविषयी योग्य खबरदारी घ्यावी. त्यांना मास्क, सॅनिटायझर व हॅण्डवॉश उपलब्ध करून द्यावे. तसेच या सर्व कामागारांची कामाच्या ठिकाणीच राहण्याची सोय करावी, आदी अटी संबंधित कंत्राटदारांना बंधनकारक करण्यात आल्या आहेत.>कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने जारी केलेल्या आदेशाचे काटेकोरपणे पालन करण्याचे स्पष्ट निर्देश संबंधित कंत्राटदारांना देण्यात आले आहेत. त्यानुसार ज्या प्रकल्पांवर मजूर व कामगारांच्या निवासाची सोय आहे, त्या प्रकल्पांची कामे टप्प्याटप्प्याने सुरू केली जाणार आहेत.- लोकेश चंद्र, व्यवस्थापकीय संचालक, सिडको

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या