शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

सर्वसामान्यांवर निर्बंध, दलालांसाठी मात्र पायघड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 23:52 IST

सिडकोतील प्रकार : नियमांच्या अंमलबजावणीत दुजाभाव

नवी मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिडको प्रशासनाने सर्वसामान्य नागरिकांसह प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना कार्यालयात प्रवेश देणे बंद केले आहे; परंतु त्याचवेळी विकासक आणि त्यांचे दलाल बिनदिक्कतपणे सिडको भवनमध्ये ये-जा करीत असल्याचे दिसून आले आहे. विशेषत: रायगड भवनमधील पणन विभागात रात्री उशिरापर्यंत या मंडळींचा वावर असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे कोरोना नियमांच्या अंमलबजावणीत सिडको दुजाभाव करीत असल्याचा आरोप केला जात आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने कठोर निर्बंध लागू केले आहेत. त्यानुसार शासकीय व निमशासकीय कार्यालयांतील कर्मचाऱ्यांची उपस्थितीही मर्यादीत करण्यात आली आहे. शासनाच्या आदेशानुसार सिडकोनेही या नियमांचे काटेकोरपणे पालन सुरू केले आहे. त्याअनुषंगाने ५ एप्रिलपासून सर्वसामान्य नागरिकांना सिडको भवनमध्ये प्रवेश बंदी करण्यात आली आहे.

तसेच नागरिकांची कामे रखडू नयेत, त्यांना संबंधित अधिकाऱ्यांशी संवाद साधता यावा यादृष्टीने सिडकोने ई व्हिजिटर्स प्रणाली विकसित केली आहे. या प्राणालीबाबत सिडकोच्या संकेतस्थळावर विस्तृत माहिती देण्यात आली आहे. त्याशिवाय संबंधित विभागप्रमुखांना भेटण्यासाठी इतर व्हर्च्युअल प्रणालीचाही अवलंब करता आला आहे. हा नियम सर्व घटकांना लागू आहे. विविध प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनासुद्धा या नियमांचे पालन बंधनकारक असल्याचे सिडकोने स्पष्ट केले आहे. असे असले तरी शहरातील काही बडे विकासक, त्यांचे प्रतिनिधी आणि काही दलाल मंडळी राजरोसपणे सिडकोत ये-जा करीत असल्याचे दिसून आले आहे. सर्वसामान्यांवर निर्बंध आणि दलालांसाठी पायघड्या, असाच काहीसा हा प्रकार असल्याची कुजबुज सिडको वर्तुळात सुरू आहे. दरम्यान, सिडकोच्या या भूमिकेमुळे  नागरिकांत संभ्रम निर्माण झाला आहे. 

टॅग्स :cidcoसिडकोNavi Mumbaiनवी मुंबई