शेफाली परब-पंडित ल्ल मुंबई
मुंबई : गझदरबंद आणि ब्रिटानिया आउटफॉलपाठोपाठ माहुल येथील पम्पिंग स्टेशन उभारण्याचा प्रकल्पही या वर्षी पर्यावरणाच्या कात्रीतूट सुटला आह़े महाराष्ट्र सागरी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाने (एमसीङोडएमए) नुकताच हिरवा कंदील दाखविल्यामुळे या प्रकल्पातील मोठा अडसर दूर झाला आह़े यामुळे कुर्ला, नेहरूनगर, अॅन्टॉप हिल येथील रहिवाशांची पावसाच्या पाण्यातून सुटका होणार आह़े
2क्क्5मध्ये मुंबईत ओढावलेल्या पुरानंतर ब्रिमस्टोव्ॉड प्रकल्पांतर्गत पजर्न्य जलवाहिन्यांची क्षमता वाढविण्याचे काम सुरू झाल़े या प्रकल्पांतर्गत उच्च क्षमतेची आठ पम्पिंग स्टेशन्स बसविण्यात येत आहेत़ मात्र आठ वर्षामध्ये हाजी अली आणि इर्ला नाला ही दोनच पम्पिंग स्टेशन्स सुरू होऊ शकली़ उर्वरित प¨म्पग स्टेशन्सची मुदत आणि खर्च वाढतो आह़ेपर्यावरण खात्याचे प्रमाणपत्र, प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन आणि जागेसाठी रखडलेले लव्हग्रोव्ह, क्लिव्हलँड आणि ब्रिटानिया पम्पिंग स्टेशनचे काम सुरू झाल़े जुलै महिन्यात सांताक्रूझ येथील गझदरबंद पम्पिंग स्टेशनच्या प्रकल्पावर काम सुरू होऊ शकल़े त्यापाठोपाठ एमसीङोडएमएनेही आता ना हरकत प्रमाणपत्र दिले आह़े मात्र अद्याप अशा आणखी काही परवानग्या मिळवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे पालिकेच्या एका वरिष्ठ अधिका:याने सांगितल़े
माहुल आणि मोगरा नाला येथील पम्पिंग स्टेशनसाठी 6 हजार चौ़मी़ जागेतील तिवरांची कत्तल होणार आह़े यावर आक्षेप घेत एमसीङोडएमएने नव्याने प्रस्ताव सादर करण्याची सूचना पालिकेला केली होती़ त्यानुसार बदल करून केवळ 12 टक्के तिवरांची झाडं या प्रकल्पात बाधित होतील, अशी हमी प्रशासनाने दिली आह़े
च्गझदरबंद पम्पिंग स्टेशनमुळे पावसाच्या पाण्याचा निचरा होणार असल्याने वांद्रे, खार आणि सांताक्रूझच्या रहिवाशांना दिलासा मिळणार आह़े
च्प्रकल्पग्रस्तांना पर्यायी जागा व स्थलांतरणात दिरंगाई झाल्याचा फटका क्लिव्हलँड आणि लव्हग्रोव्ह प्रकल्पाला बसला़ दोन्ही प्रकल्प 2क्11मध्ये सुरू होऊन गतवर्षी पूर्ण होणो अपेक्षित होत़े
च्मुंबई पोर्ट ट्रस्ट, एमसीङोडएमए आणि वन व पर्यावरण मंत्रलयाचा हिरवा कंदील मिळण्यास विलंब झाल्यामुळे ब्रिटानिआ पम्पिंग स्टेशन रखडल़े
च्प्रस्तावित पम्पिंग स्टेशन्स - 8
च्कार्यान्वित 2 - हाजी अली, ईला
च्काम सुरू - लव्हग्रोव्ह, क्लिव्हलँड, ब्रिटानिया, गझदरबंद
च्सरकारी लालफितीत अडकलेले - माहुल आणि मोगरा़
च्प्रकल्पाचा खर्च साडेतीन हजार कोटी रुपय़े जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनर्निर्माण अभियान अंतर्गत केंद्रातून 1,2क्क् कोटींचा निधी या प्रकल्पाला मिळालेला आह़े