शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

वटपौर्णिमेनिमित्त वृक्ष संवर्धनाचा संकल्प; पालिका कर्मचाऱ्यांचीही वृक्षलागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 01:39 IST

तीन दिवसांमध्ये ५७५ टन फणस विक्री

नवी मुंबई : वटपौर्णिमेनिमित्त वडाच्या झाडांच्या फांद्या तोडण्याऐवजी वृक्ष संवर्धन करण्याचा संकल्प शहरातील अनेक महिलांनी जाहीर केला. महापालिकेच्या महिला कर्मचाऱ्यांनी ५० रोपांची लागवड केली आहे. वटपौर्णिमेच्या निमित्ताने फळांना मोठ्या प्रमाणात मागणी वाढली होती. बाजार समितीमध्ये तीन दिवसांमध्ये तब्बल ५७५ टन फणसाची विक्री झाली आहे.प्रत्येक वर्षी वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या फांद्या मोठ्या प्रमाणात तोडल्या जातात. यामुळे पर्यावरणाची हानी होत असल्यामुळे सामाजिक कार्यकर्त्यांनी जनजागृती सुरू केली आहे. महापालिका प्रशासनानेही या वर्षी वृक्षारोपणाचे आवाहन केले होते. सुरुवात म्हणून शनिवारी महापालिका मुख्यालयामधील कर्मचाºयांनी इमारतीच्या परिसरामध्ये ५० चाफ्याचे वृक्ष लावले आहेत. या वेळी सचिव चित्रा बावीस्कर यांच्यासह १०० पेक्षा जास्त महिला कर्मचारी उपस्थित होत्या. नागरिकांना वृक्षरोपणाचे महत्त्व पटवून देताना पालिकेच्या कर्मचाºयांनी स्वत:पासून सुरुवात केली आहे. सीबीडी, नेरुळ व इतर परिसरामध्येही रविवारी अनेक महिलांनी वृक्षारोपण करून वटपौर्णिमेचा सण साजरा केला. या व्यतिरिक्त शहरात विविध ठिकाणी पारंपरिक पद्धतीने वटवृक्षाची पूजा करून सण साजरा करण्यात आला.वटपौर्णिमेदिवशी फळांना मोठ्या प्रमाणात मागणी होत असते. बाजार समितीमध्ये कोकण, कर्नाटक, आंध्रप्रदेश व तामिळनाडूमधून मोठ्या प्रमाणात आवक झाली होती. तीन दिवसांत तब्बल ५७५ टन फणसाची विक्री झाली आहे.

टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका