शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

विमानतळाच्या कामाला ग्रामस्थांचा पुन्हा विरोध; आंदोलकांची धरपकड, भरावाचे काम पाडले बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 06:44 IST

चिंचपाडा गावाजवळील तलावपाळी या ग्रामस्थांनी गुरुवारी विमानतळाच्या भरावाचे काम बंद केले.आमच्या तलावपाळीच्या ग्रामस्थांना इतर प्रकल्पग्रस्तांसारखा मोबदला मिळावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.

पनवेल : चिंचपाडा गावाजवळील तलावपाळी या ग्रामस्थांनी गुरुवारी विमानतळाच्या भरावाचे काम बंद केले.आमच्या तलावपाळीच्या ग्रामस्थांना इतर प्रकल्पग्रस्तांसारखा मोबदला मिळावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. भरावाचे काम बंद केल्याची माहिती पनवेल शहर पोलिसांना लागल्यानंतर पोलिसांनी ग्रामस्थांची धरपकड सुरू करून त्यांना अटक केली.विमानतळाच्या कामकाजाला जोरात सुरुवात झाली आहे. विमानतळासाठी पनवेल तालुका परिसरातील १० गावांचे पुनर्वसन याच ठिकाणी सिडकोने तयार केलेल्या पुष्पकनगर येथे केले जाणार आहे. सिडको हस्तांतरण करून विमानतळाच्या कामाला सुरुवात केली आहे. हस्तांतरणाबरोबर जवळपास ९० टक्के पुनर्वसनाची कामे सिडकोने केल्याचा दावा केला आहे. तर उर्वरित कामे तीन महिन्यांत करून १०० टक्के पुनर्वसन करण्याचे आश्वासन सिडकोने दिले आहे. मात्र, पनवेल शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या आणि चिंचपाडा गावाच्या शेजारी असलेल्या तलावपाळी ग्रामस्थांना या विमानतळाचा योग्य तो मोबदला न दिल्याने येथील ३० ते ४० ग्रामस्थांनी तलावपाळी परिसरात सुरू असलेल्या विमानतळाच्या भरावाचे कामकाज बंद पाडले. इतर प्रकल्पबाधितांसारखा आम्हाला देखील मोबदला सिडकोने द्यावा आणि नंतर कामाला सुरुवात करावी, अशी मागणी करत प्रकल्पाचे काम बंद पाडले.सिडकोसोबत वारंवार पत्रव्यवहार आणि गाठीभेटी घेऊनदेखील तलावपाळी परिसरातील ग्रामस्थांना इतर प्रकल्पग्रस्तांसारखा मोबदला न मिळाल्याचा राग मनात धरत. आपल्या घराला आणि शेती तसेच जागेला मोबदला देण्याची मागणी केली. या वेळी घटनास्थळी पोहोचलेल्या सिडको अधिकाºयांनी मार्ग काढण्याचे आश्वासन दिले. या आश्वासनाला जुमानता ग्रामस्थांनी ही कामे बंद ठेवत आपला विरोध दर्शविला. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी पोहोचलेल्या पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेऊन गावकºयांची समज काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, ग्रामस्थांनी विरोध कायम ठेवल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई