शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

धोकादायक इमारतीतील रहिवाशांची फरफट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 23:26 IST

नेते, विकासकाच्या कात्रीत पुनर्बांधणीला खोडा

नवी मुंबई : सिडकोनिर्मित्त जुन्या व मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्बांधणीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. राज्याच्या नगरविकास विभागाने यासंदर्भात सिडकोकडे बोट दाखविल्याने मागील तीन दशकांपासून जीव मुठीत घेऊन राहणाऱ्या रहिवाशांत असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, पुनर्बांधणीच्या रखडलेल्या प्रश्नाच्या मुळाशी जाण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते बी. एन. कुमार यांनी आता पुढाकार घेतला आहे. त्यासाठी त्यांनी ‘दिल से नवी मुंबई’ हे आॅनलाइन व्यासपीठ स्थापन केले आहे. या माध्यमातून मोडकळीस आलेल्या इमारतींच्या सद्य:स्थितीचा संपूर्ण तपशील गोळा करून पुढील कायदेशीर लढाई लढण्याचा निर्धार बी. एन. कुमार यांनी व्यक्त केला आहे.शहराची निर्मित्ती करताना सिडकोने नवी मुंबईच्या विविध भागांत निवासी इमारती बांधल्या. परंतु या इमारतींची अल्पावधीतच पडझड सुरू झाली. इमारतीचे बांधकाम झाल्यानंतर अवघ्या १० वर्षांत या इमारती राहण्यास योग्य नसल्याचा निर्वाळा आयआयटीसारख्या संस्थेने दिला होता. तेव्हापासून या इमारतींच्या पुनर्बांधणीचा प्रश्न चर्चेत आहे. याच प्रश्नावर अनेक निवडणुका लढल्या गेल्या. मात्र ३५ वर्षांनंतरसुद्धा हा प्रश्न जैसे थेच राहिला आहे. राज्य सरकारने या इमारतींच्या पुनर्बांधणीसाठी अडीच एफएसआयची घोषणाही केली आहे. मात्र त्याची अधिसूचना निघाली नाही. त्यामुळे रहिवासी संभ्रमात आहेत. दुसरीकडे पुनर्बांधणीसाठीचे अनेक प्रस्ताव परवानगीसाठी सिडकोकडे पडून आहेत. तर महापालिकेकडूनही अपेक्षित प्रतिसाद मिळताना दिसत नाही.नवी मुंबईतील सामाजिक कार्यकर्ते बी. एन. कुमार यांनी यासंदर्भात राज्याच्या नगरविकास विभागाकडे माहितीच्या अधिकाराखाली अर्ज केला होता. मात्र नगरविकास विभागाने इमारतीच्या पुनर्बांधणीचा चेंडू सिडकोच्या कोर्टात ढकलत अप्रत्यक्षरीत्या जबाबदारी झटकून टाकली आहे. सिडकोकडूनसुद्धा याबाबत समाधानकारक उत्तर न मिळाल्याने कुमार यांनी आक्रमक पवित्रा घेत या मुद्द्यावर कायदेशीर संघर्ष करण्याचा पवित्रा घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून त्यांनी ‘दिल से नवी मुंबई’ हे आॅनलाइन व्यासपीठ स्थापन केले असून, सिडकोनिर्मित्त इमारतींचा सुरुवातीपासूनचा तपशील त्यावर अपलोड करण्याचे आवाहन रहिवाशांना केले आहे.इमारतीच्या उभारणीपासून आतापर्यंतच्या स्थितीबाबत रहिवाशांना १५ प्रश्न विचारण्यात आले आहेत. सिडको व नगरविकास विभागाकडे आरटीआईच्या माध्यमातून या प्रश्नांना उत्तरे मागितली जाणार असल्याचे बी. एन. कुमार यांनी स्पष्ट केले आहे.तांत्रिक अडचणीधोकादायक म्हणून जाहीर केलेल्या इमारतीच्या भूखंडाची मालकी आजही सिडकोच्या नावे आहे. महापालिकेच्या माध्यमातून पाठविल्या जाणाºया मालमत्ता कराच्या देयकावर याचा आजही स्पष्ट उल्लेख पाहायला मिळतो. सिडकोने येथील जमिनी ६0 वर्षांच्या भोडकरारावर दिल्या आहेत. त्यामुळे पुनर्बांधणीत तांत्रिक अडचणी निर्माण होत असल्याचे सिडकोचे म्हणणे आहे.