शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबईत सिडकोच्या भूखंडांचे राखीव दर जैसे थे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2021 01:34 IST

संचालक मंडळाचा निर्णय: बांधकाम क्षेत्राला दिलासा देण्याचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्क नवी मुंबई : नोड व नोडच्या बाहेरील क्षेत्रात असलेल्या आपल्या भूखंडांच्या राखीव किमतीत वाढ न करता, ते जैसे थे ठेवण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. चालू आर्थिक वर्षासाठी म्हणजेच १ एप्रिल, २०२० ते ३१ मार्च, २०२१ या कालावधीसाठी हा निर्णय लागू असणार आहे. या निर्णयाचा सर्वाधिक फायदा बांधकाम क्षेत्राला होईल, असा विश्वास सिडकोने व्यक्त केला आहे.

नवी मुंबईतील बहुतांशी जमिनीची मालकी सिडकोकडे आहे. त्यामुळे सिडकोच्या माध्यमातून दरवर्षी येथील भूखंडांचे राखीव दर जाहीर केले जातात. या दरात दरवर्षी ५ ते १५ टक्के इतकी वाढ दर्शविली जाते. या राखीव दराच्या आधारेच संबंधित विभागातील जमिनीची किमत निश्चित केली जाते. ही प्रक्रिया मागील अनेक वर्षांपासून अखंडितपणे सुरू असल्याने नवी मुंबईतील भूखंडांचे दर गगनाला भिडले आहेत. पर्यायाने घरांच्या किमतीही सर्वसामान्यांच्या अवाक्याबाहेर गेल्या आहेत, परंतु अगोदरच मंदीचा फटका बसलेल्या रियल इस्टेट क्षेत्राला कोरोना संसर्गाने पूर्णत: ढवळून काढले आहे. या काळात सुरू असलेले अनेक बांधकाम प्रकल्प ठप्प पडले, तर सध्याच्या परिस्थितीत नवीन बांधकाम सुरू करण्यास कोणीही विकासक धजावताना दिसत नाही. त्यामुळे बजेटमधील घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या सर्वसामान्य ग्राहकांची परवड झाली आहे. या पार्श्वभूमीवर मरगळलेल्या बांधकाम क्षेत्राला चालना देण्यासाठी सिडकोने चालू आर्थिक वर्षात भूखंडांच्या राखीव दरात वाढ न करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या आर्थिक वर्षाकचे दर कायम ठेवले. 

विकासकांना फायदा चालू आर्थिक वर्षात म्हणजेच१ एप्रिल, २०२० ते ३१ मार्च, २०२१ या कालावधीत भूखंडांच्या राखीव दरात कोणतीही वाढ न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे भूखंडांचे दर स्थीर राहण्यास मदत होणार आहे. या निर्णयाचा सर्वाधिक फायदा विकासकांना होणार असल्याचे सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.संजय मुखर्जी यांनी स्पष्ट केले आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई