शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

कंडोमिनियमअंतर्गतची कामे रखडल्याने संताप

By admin | Updated: September 27, 2016 03:18 IST

राज्य शासनाच्या आदेशानुसार महापालिकेने कंडोमिनियमअंतर्गतची विकासकामे बंद केली आहेत. या परिसरात नागरी सुविधांचा बोजवारा उडाला आहे. त्यामुळे स्थानिक

नवी मुंबई : राज्य शासनाच्या आदेशानुसार महापालिकेने कंडोमिनियमअंतर्गतची विकासकामे बंद केली आहेत. या परिसरात नागरी सुविधांचा बोजवारा उडाला आहे. त्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधींना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर कंडोमिनियमअंतर्गतच्या कामांवरील स्थगिती उठवावी, यासाठी कोपरखैरणेतील नगरसेविका मेघाली मधुकर राऊत यांनी याप्रकरणी आता थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे घातले आहे.शहराची उभारणी करताना सिडकोने अल्प उत्पन्न घटक आणि माथाडी कामगारांसाठी विविध नोड्समध्ये मोठ्या प्रमाणात घरे बांधली आहेत. कोपरखैरणे विभागात माथाडी कामगारांची मोठ्या प्रमाणात घरे आहेत. ही घरे वेगवेगळ्या कंडोमिनियमध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. पूर्वी कंडोमिनियमअंतर्गतची कामे महापालिकेच्या माध्यमातून केली जात होती. परंतु अडीच वर्षांपूर्वी राज्य सरकारच्या आदेशानुसार महापालिकेने ही कामे बंद केली आहेत. त्यामुळे कंडोमिनियमअंतर्गत सोयी-सुविधांची दैना उडाली आहे. विशेषत: रस्ते, मलनि:सारण वाहिन्या, नाले, गटारे आदी प्रकारच्या सुविधा रसातळाला गेल्या आहेत. कोपरखैरणे विभागात महापालिकेच्या १७ प्रभागांपैकी ९ प्रभाग कंडोमिनियमअंतर्गत मोडतात. त्यामुळे राज्य शासनाच्या या निर्णयाचा सर्वाधिक फटका या वसाहतींना बसला आहे. यासंदर्भात स्थानिक नगरसेवक हतबल आहेत. त्यामुळे दाद कोणाकडे मागायची, असा सवाल रहिवाशांनी उपस्थित केला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या नगरसेविका (प्रभाग क्रमांक ३८) मेघाली मधुकर राऊत यांनी याप्रकरणी थेट मुख्यमंत्र्यांना साकडे घातले असून यासंदर्भात निर्णय घेण्याची मागणी केली आहे. मेघाली राऊत यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांना एक निवेदनदिले आहे.सर्वाधिक कंडोमिनियम कोपरखैरणे विभागात आहेत. त्यापाठोपाठ ऐरोली, वाशी, तुर्भे, नेरूळ आदी भागात कंडोमिनियम आहेत. महापालिकेने कामे बंद केल्याने येथील रहिवाशांना विविध नागरी समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी लक्ष घालावे, अशी मागणी शिवसेनेचे कोपरखैरणे विभाग प्रमुख मधुकर राऊत यांनी केली आहे.