शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

पारपत्रासाठी पायपीट करण्याच्या जाचातून शहरवासीयांची सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 23:14 IST

अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर शहरवासीयांना पारपत्र अर्थात पासपोर्ट कार्यालय मिळाले आहे.

नवी मुंबई : अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर शहरवासीयांना पारपत्र अर्थात पासपोर्ट कार्यालय मिळाले आहे. वाशी येथील पोस्ट कार्यालयात शनिवारपासून ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे पासपोर्ट काढण्यासाठी होणाऱ्या जाचातून नवी मुंबईकरांची आता सुटका झाली आहे. ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते खासदार राजन विचारे यांच्या प्रमुख उपस्थितीत या कार्यालयाचा शुभारंभ करण्यात आला.नवी मुंबईतील नागरिकांना पासपोर्ट काढण्यासाठी ठाणे येथे जावे लागत असे. यात वेळ आणि पैशाचा अपव्यय होत असल्याने नवी मुंबईसाठी स्वतंत्र पासपोर्ट सेवा कार्यालय सुरू करावी, अशी शहरवासीयांची जुनी मागणी होती. त्यानुसार माजी खासदार संजीव नाईक यांनी सुरुवातीच्या काळात त्यासाठी काही प्रमाणात पाठपुरावा केला होता. त्यानंतर विद्यमान खासदार राजन विचारे यांनी या मागणीचा जोरदार पाठपुरावा सुरू केला. खासदारकीच्या पहिल्या टर्ममध्ये नवी मुंबईसाठी स्वतंत्र पासपोर्ट कार्यालयाला मंजुरी मिळविण्यात ते यशस्वी ठरले; परंतु विविध कारणांमुळे त्याच्या अंमलबजावणीस विलंब झाला. अखेर लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर विचारे यांनी वाशी येथील टपाल कार्यालयात पासपोर्ट सेवेचे औपचारिक उद्घाटन केले; परंतु त्यासाठी आवश्यक असलेल्या बाबींची पूर्तता न झाल्याने शहरवासीयांच्या दृष्टीने हे कार्यलय निरुपयोगी ठरले. त्यामुळे पुन्हा निवडून येताच त्यांनी तांत्रिक बाबींची पूर्तता करण्यासाठी पुन्हा पाठपुरावा सुरू केला. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश येऊन नवी मुंबईकरांना अखेर स्वतंत्र पासपोर्ट कार्यालय मिळाले.दरम्यान, शनिवारी संपन्न झालेल्या कार्यक्रमाला शिवसेनेचे उपनेते विजय नाहटा, आमदार मंदा म्हात्रे, आमदार रमेश पाटील, महापालिकेतील विरोधी पक्षनेते विजय चौगुले, जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे तसेच महाराष्ट्र सर्कलचे मुख्य टपाल अधिकारी हरिश्चंद्र अग्रवाल, नवी मुंबईचे टपाल अधिकारी शोभा मधाळे, क्षेत्रीय अधिकारी तुलसीदास शर्मा, पासपोर्ट सहायक अधिकारी विशाल हिवाळे आदी उपस्थित होते.>नव्याने सुरू झालेल्या पासपोर्ट सेवा केंद्रात आवश्यक मनुष्यबळ आणि साधनसामग्री उपलब्ध करण्यात आली आहे. त्यानुसार या सेवा केंद्रात सध्या दोन पोस्टल सहायक अधिकारी व एक पासपोर्ट पडताळणी अधिकारी नियुक्त करण्यात आला आहे. या ठिकाणी दिवसाला २० अर्जाची पडताळणी केली जाणार आहे. पडताळणीनंतर आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून साधारण तीन ते चार दिवसांत संबंधितांना घरपोच पासपोर्ट मिळणार आहे. वाशी येथील पासपोर्ट सेवा केंद्रामुळे नवी मुंबईसह पनवेल, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ या भागातील रहिवाशांना दिलासा मिळणार आहे.