शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

पुलांच्या दुरुस्तीचा वाहतुकीला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 23:39 IST

ठिकठिकाणी वाहतूककोंडी; वाहनचालकांची कसरत

नवी मुंबई : सायन-पनवेल मार्गावर दोन ठिकाणी सुरू असलेल्या पुलांच्या दुरुस्तीकामाचा फटका वाहतुकीला बसत आहे. परिणामी, रहदारीच्या वेळेस वाहतूककोंडी वाढत असल्याने त्यावर नियंत्रण मिळवण्याच्या प्रयत्नात वाहतूक पोलिसांवरील ताणही वाढत चालला आहे. अशातच ठाणे बेलापूर मार्गावरही रबाळे येथे रस्त्याच्या दुरुस्तीकामामुळे वाहतूक वळवण्यात आल्यानेही नोडअंतर्गतच्या रस्त्यावरील वर्दळ वाढली आहे.सायन-पनवेल मार्गावरील वाशी खाडीपूल व सानपाडा पूल येथील एका लेनचे काम हाती घेण्यात आले आहे. वाशी खाडीपुलावर मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर तर सानपाडा पुलावर पनवेलकडे जाणाºया लेनवर ही कामे सुरू आहेत. त्या ठिकाणी सातत्याने खड्डे पडून होणारे अपघात टाळण्यासाठी रस्त्याचे काँक्रीटीकरण केले जात आहे. त्याकरिता एकच लेन सुरू ठेवण्यात आलेली आहे. मात्र, मुंबई-पुणे मार्गावरील सायन-पनवेल हा महत्त्वाचा मार्ग असल्याने त्यावर सतत वाहनांची वर्दळ असते. सकाळ-संध्याकाळच्या वेळी त्यात अधिकच भर पडलेली असते. त्यामुळे दोन्ही पुलांच्या ठिकाणी सकाळ-संध्याकाळ मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत आहे. त्यात रुग्णवाहिकांसह इतर अत्यावश्यक सुविधांचीही वाहने अडकून पडत आहेत. तर सानपाडा येथील पुलावरील कामाला पर्याय म्हणून पुलाखालील रस्त्याने वाहने वळवली जात आहेत. तर पुलावरून एका लेनमध्येच वाहने सोडण्यात येत आहेत. याचा परिणाम सानपाडा पुलाखालील जंक्शनवरील वाहतुकीवर होत आहे. सदर एपीएमसी मार्केटला जोडणारा हा महत्त्वाचा चौक असल्याने अगोदरच त्या ठिकाणी सतत वाहतूककोंडी असते.अशातच पुलावरील निम्मी वाहतूक पुलाखालून वळवली जात असल्याने तिथल्या कोंडीत अधिकच वाढ होताना दिसत आहे. यामुळे वाहनचालकांच्या पुढे जाण्याच्या घाईत त्यांच्यात वादही उद्भवत आहेत. यामुळे वाशी ते तुर्भे दरम्यानच्या सर्व जंक्शन व वाहतूककोंडी होणाºया ठिकाणी वाहतूक पोलिसांचा बंदोबस्त नेमण्यात आला आहे. अशातच सानपाडा पुलाखालील खासगी ट्रॅव्हल्सचे अवैध थांबे वाहतूककोंडीत अधिकच भर टाकत आहेत. यानंतरही कारवाईत होत नसल्याचे आश्चर्य व्यक्त होत आहे.यामुळे अगोदरच अरुंद असलेल्या रस्त्यांवर वाहनांची संख्या वाढल्याने नोड अंतर्गतच्या रस्त्यांवरही वाहतूककोंडी वाढत चालली आहे. एकाच वेळी दोन्ही महत्त्वाच्या मार्गांवर सुरू असलेल्या या दुरुस्तीकामांमुळे शहराच्या दोन्ही टोकाच्या मार्गावर वाहतूककोंडीची समस्या निर्माण होत आहे. याचा त्रास वाहनचालकांसह प्रवाशांना सहन करावा लागत आहे.अंतर्गत वाहतूक विस्कळीतठाणे-बेलापूर मार्गावर रबाळे येथे ऐरोलीत प्रवेशाच्या मार्गावर रस्त्याचे दुरुस्तीकाम हाती घेण्यात आले आहे. याकरिता तिथली वाहतूक वळवण्यात आली आहे. परिणामी, ऐरोली मार्गे मुलुंडकडे जाणारी छोटी वाहने घणसोली, रबाळे, गोठीवली येथील अंतर्गतच्या मार्गाने जात आहेत.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडी