शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबईतील मोक्याचे भूखंडही आता गिळंकृत होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 00:14 IST

अडीच चटईक्षेत्र फक्त पीएम आवास योजनेसाठीच : त्या आदेशात सिडको वसाहतींसह गावठाणे उपेक्षितच

नारायण जाधव नवी मुंबई : शासनाच्या नगरविकास विभागाने गेल्या गुरुवारी काढलेला अडीच चटईक्षेत्राचा आदेश हा नवी मुंबईतील धोकादायक झालेल्या सिडकोच्या जुन्या वसाहतींसाठी नव्हे, तर फक्त शहरात बसस्थानके, रेल्वेस्थानके आणि इतर मोकळ्या भूखंडावर आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अल्प उत्पन्न गटांसाठी घरे बांधणाऱ्या प्रकल्पांनाच लागू होणार आहे. जाणकारांच्या मतांनुसार आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अल्प उत्पन्न गटांसाठी पंतप्रधान आवास योजनेंतर्गत सिडको नवी मुंबईत जी ९० हजार घरे बांधणार आहे, त्या भूखंडांवर विकसित होणाºया प्रकल्पांनाच हे अडीच चटईक्षेत्र मिळणार आहे. यामुळे सिडकोच्या जुन्या वसाहतींसह मूळ गावठाणांतील रहिवाशांची मोठ्या घरांची प्रतीक्षा कायम राहणार आहे. सध्या नवी मुंबई महापालिका क्षेत्रात सिडकोकडे मोक्याचे भूखंड नसल्यात जमा आहेत. जे काही आहेत ते रेल्वेस्थानके, बसस्थानके आणि ट्रक टर्मिनलचे आहेत. त्यातीलच काही भूखंडांवर सिडकोने पंतप्रधान आवास योजनेची ९० हजार घरे बांधण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, सिडको आणि नवी मुंबई महापालिकेच्या डीसी रूलमध्ये अडीच चटईक्षेत्राची तरतूद नाही. सिडकोने शहरातील सानपाडा, जुईनगर रेल्वेस्थानके परिसरासह वाशी ट्रक टर्मिनलच्या भूखंडासह इतर मोक्याच्या ठिकाणी असलेल्या भूखंडावर ही ९० हजार घरे बांधण्याचा जो निर्णय घेतला आहे, त्यासाठीच हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे.

६० टक्के घरे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आरक्षित ठेवणे बंधनकारकज्या विकासकांना किंवा बसस्थानकांसह मेट्रो आणि रेल्वेस्थानकांच्या परिसरातील भूखंडांवर अडीच चटईक्षेत्राचा लाभ घ्यायचा असेल, त्यांनी त्या प्रकल्पांतील एकूण घरांपैकी 60% घरे ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अल्प उत्पन्न गटांसाठी बांधणे गरजेचे असून ती त्या गटांसाठीच आरक्षित ठेवणे बंधनकारक आहे.

शिवाय, अडीच चटईक्षेत्राचा लाभ घेण्यासाठी कमीतकमी चार हजार चौरस मीटरचा एकत्रित भूखंड असावा. तो १८ मीटर रुंदीच्या रस्त्यास हा भूखंड जोडलेला असावा. पुनर्विकास करताना 15% जागा खुली ठेवावी.

नाल्यापासून भूखंडाचे अंतर १५ मीटर लांब असावे, यासह सदर भूखंड रेल्वे/ मेट्रोस्थानकापासून ५०० मीटर आणि बसस्थानकापासून ३०० मीटर लांब असावा, अशा अटी आहेत.

त्या पाहिल्या तर नवी मुंबईतील सानपाडा, जुईनगर रेल्वेस्थानकांसमोरील भूखंडांसह कळंबोली, पनवेल बसस्थानक, वाशी ट्रक टर्मिनलच्या मोक्याच्या जागा गिळंकृत होणार एवढे मात्र नक्की.