शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

वंडर्स पार्कमध्ये फेरबदल, येणार अत्याधुनिक खेळणी, २२ कोटींचा खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 06:25 IST

Renovation of Wonders Park : शहराच्या आकर्षणात भर घालणाऱ्या आणि शहराचे नावलौकिक वाढविणाऱ्या नेरूळ सेक्टर १९ मधील वंडर्स पार्कला विविध खेळणी, जगातील सात आश्चर्याच्या प्रतिकृती, हिरवळ आदींमुळे नागरिक आणि बच्चेकंपनीने पसंती दिली आहे.

- योगेश पिंगळे 

नवी मुंबई : नेरूळ येथील वंडर्स पार्कमधील खेळणी जुनी, धोकादायक आणि नादुरुस्त झाली असून अनेक खेळणी बंद अवस्थेत आहेत. यामुळे पार्कमध्ये येणाऱ्या नागरिक आणि लहान मुलांचा हिरमोड होत आहे. या पार्कच्या सुधारणेसह फेरबदल केला जाणार असून विविध अत्याधुनिक खेळणी बसविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. वंडर्स पार्कला नवीन झळाळी देण्यासाठी सुमारे २२ कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे.शहराच्या आकर्षणात भर घालणाऱ्या आणि शहराचे नावलौकिक वाढविणाऱ्या नेरूळ सेक्टर १९ मधील वंडर्स पार्कला विविध खेळणी, जगातील सात आश्चर्याच्या प्रतिकृती, हिरवळ आदींमुळे नागरिक आणि बच्चेकंपनीने पसंती दिली आहे. पार्कमध्ये २०१० साली खेळणी बसविण्यात आली असून फेसबी, ऑक्टोपस, क्रिकेट गेम ही खेळणी धोकादायक झाल्याने बंद आहेत तसेच फेरीस व्हील, ब्रेक डान्स, मिनी टॉय ट्रेन या खेळण्यांचे आयुष्यमान संपुष्टात आले आहे. येथील अनेक खेळणी बंद असल्याने बच्चेकंपनीचा हिरमोड होत असल्याने पार्कमध्ये फेरबदल करून सुधारणा करण्याचा निर्णय नवी मुंबई महापालिका प्रशासनाने घेतला आहे. यामध्ये प्रामुख्याने बंपर कार, स्काय स्वीगर, स्काय लॉफटर, स्काय व्हील, रॉकिंग डिस्क, वॉर्म कोस्टर या सहा अत्याधुनिक जॉय राइड्स बसविण्यात येणार आहेत तसेच, म्युझिकल फाैंटन, सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे, मनोरंजनासाठी ऑडिओ सिस्टीमही  बसविण्यात येणार आहे.  या नव्या खेळण्यांमुळे त्यामुळे बच्चेकंपनीत उत्साह वाढणार आहे.

तिकीट खरेदी होणार कॅशलेस वंडर्स पार्कमध्ये प्रवेशासाठी तसेच विविध खेळण्यांचा आनंद घेण्यासाठी तिकीट आकारण्यात येते. तिकीट खरेदीची प्रकिया कॅशलेस होण्यासाठी स्मार्ट कार्ड सिस्टीम बसविण्यात येणार आहे. यामुळे तिकीट खरेदीसाठी लागणारा विलंब टाळता येणार असून नागरिकांना रांगा लावण्याची गरज पडणार नाही. 

वंडर्स पार्कमध्ये फेरबदल आणि सुधारणा करण्याचा कामाचा प्रस्ताव निविदा प्रक्रियेत आहे. पार्कमध्ये अत्याधुनिक सुविधा उपलब्ध झाल्यावर पार्कच्या सौंदर्यात भर पडणार असून नागरिकांचा आणखी ओढा वाढेल.- सुरेंद्र पाटील, शहर अभियंता, न.मुं.म.पा.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई