शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांगांच्या मार्गातील अडथळे दूर करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 00:39 IST

शहरातील रस्ते, पदपथ व महापालिकेच्या इमारतीमध्ये दिव्यांगांनाही सहज ये - जा करता यावी यासाठी अडथळामुक्त शहर निर्मितीकडे पालिका लक्ष देत आहे.

नवी मुंबई : शहरातील रस्ते, पदपथ व महापालिकेच्या इमारतीमध्ये दिव्यांगांनाही सहज ये - जा करता यावी यासाठी अडथळामुक्त शहर निर्मितीकडे पालिका लक्ष देत आहे. दिव्यांगांच्या मार्गातील अडथळे दूर करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती आयुक्त रामास्वामी एन. यांनी दिली आहे.पालिकेच्या ई.टी.सी. अपंग शिक्षण, प्रशिक्षण, सेवा सुविधा केंद्र व अभियांत्रिकी विभागाच्या सहयोगाने मुख्यालयात अडथळामुक्त चालण्यायोग्य शहराविषयीच्या विशेष वॉकॅबिलिटी कार्यशाळेचे आयोजन केले होते. यापुढील काळात प्रत्येक काम करताना ते अडथळामुक्त व चालण्यायोग्य असेल याकडे विशेष लक्ष देण्यात यावे. शासनाने याविषयी दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार तपासणी सूची तयार करण्यात आली असून त्यानुसार काम करावे व कामात सातत्य असावे अशा सूचना यावेळी आयुक्तांनी केल्या.शहर अभियंता मोहन डगांवकर यांनी नवी मुंबई हे आधुनिक शहर अधिक राहण्यायोग्य बनविण्याचा आपला प्रयत्न असल्याचे स्पष्ट केले. १ ते ३ किमीचे अंतर सर्व नागरिकांना सुलभ रीतीने चालत जाण्यासाठी योग्य व्हावे ही वॉकॅबिलिटी संकल्पनेमागील भूमिका असल्याचे स्पष्ट केले. ई.टी.सी. केंद्र संचालिका वर्षा भगत यांनी एकाच छताखाली सर्व प्रकारच्या व सर्व वयोगटातील दिव्यांग व्यक्तींना शिक्षण, प्रशिक्षण देणारे ई.टी.सी. हे देशातील एकमेव केंद्र असल्याचे स्पष्ट केले. मुख्य व्याख्यात्या अनिता अय्यर नारायणन यांनी दिव्यांग व्यक्तींना समाजात वावरताना भासणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी विशेष लक्ष देऊन प्रयत्न करण्याची गरज त्यांनी विषद केली. याप्रसंगीअतिरिक्त आयुक्त रवींद्र पाटील, अतिरिक्त आयुक्त रमेश चव्हाण, अतिरिक्त शहर अभियंता सुरेंद्र पाटील उपस्थित होते.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई