शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सिडको नोडमधील समस्यांचा डोंगर दूर करा, शेकाप शिष्टमंडळांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 02:47 IST

पनवेल महापालिका क्षेत्रातील सिडको नोडमध्ये समस्यांचा डोंगर वाढत चालला असून, सिडको प्रशासनाचे सर्वच स्तरावर या समस्यांकडे दुर्लक्ष होत आहे.

पनवेल : पनवेल महापालिका क्षेत्रातील सिडको नोडमध्ये समस्यांचा डोंगर वाढत चालला असून, सिडको प्रशासनाचे सर्वच स्तरावर या समस्यांकडे दुर्लक्ष होत आहे. यासंदर्भात शेकापच्या शिष्टमंडळाने सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी सोबत सर्व लोकप्रतिनिधी व नगरसेवक यांच्यासोबत सोमवारी बैठक घेऊन त्यांना समस्यांची माहिती दिली.सध्या सर्वत्र उत्साहाचे वातावरण असताना, सिडको नोडमध्ये मूलभूत समस्या भेडसावत आहेत. गटारे, कचरा, सिवरेज लाइन, आदी समस्यांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. शहरात अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. वेळोवेळी डांबरीकरण केले जात नसल्याने अनेक नोडमध्ये मोठमोठे खड्डे पडले आहेत.सिडकोच्या महत्त्वाच्या नोडलगत २९ गावांचा समावेश आहे. या गावांची परिस्थिती अत्यंत बिकट असून, सिडकोने शहराच्या धर्तीवर गावांमध्ये सोयी-सुविधा पुरविणे गरजेचे आहे. स्थानिकांच्या जमिनीवर सिडकोने नवी मुंबई शहर वसविले असल्याने गावात सुविधा देणे सिडकोची जबाबदारी असल्याचे आमदार बाळाराम पाटील यांनी सांगितले. येथील गरजेपोटीची घरे, मंदिरे सिडको अनधिकृत ठरवत आहे.एकीकडे सिडको नोड पालिकेकडे हस्तांतरणाची प्रक्रि या सुरू आहे. मात्र, नोडच्या दुरवस्थेमुळे सिडको नोड पालिकेकडे हस्तांतरणापूर्वी विविध समस्या दूर झाल्या पाहिजेत, असा आग्रह शेकाप नेत्यांनी या वेळी घेतला. माजी आमदार विवेक पाटील हेदेखील या वेळी प्रामुख्याने उपस्थित होते.सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांच्यासोबत या वेळी विविध नोडमधील प्रशासक उपस्थित होते. गगराणी यांनी संबंधित अधिकाºयांना शेकापने मांडलेल्या समस्यांचे सर्व्हे करण्याचे आदेश दिले. या वेळी उपस्थितांमध्ये आमदार बाळाराम पाटील, माजी आमदार विवेक पाटील, शेकाप गटनेते प्रीतम म्हात्रे, हरेश केणी, गुरु नाथ गायकर, गोपाळ भगत, बबन मुकादम, रवींद्र भगत, अजीज पटेल आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.