शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

टोल नाक्यावरील उर्वरित 22 कर्मचारीदेखील कामावर रूजू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2020 13:50 IST

ठेकेदार व कामगारांच्या शिष्टमंडळात यशस्वी तोडगा

पनवेल: लॉकडाऊनच्या काळात सायन पनवेल महामार्गावरील 39 कामगारांना टोल कंत्राटदाराची कामावरून तडकाफडकी कमी केले होते. कंत्राटदार केएमडीआर सर्व्हिसेस यांच्या या धोरणाने या कर्मचाऱ्यांनी आंदोलनाची भूमिका स्वीरल्यानंतर कंत्राटदाराने या संबंधित कामगारांना कामावर परत घेण्यास तयारी दर्शविली आहे.या कर्मचाऱ्यांमध्ये अटेन्डन्स, इंचार्ज, सुपरवायझर आदी पदांवर हे कर्मचारी कार्यरत आहेत.यापूर्वी स्थानिक आमदार आणि टोल कंत्राटदार राजकुमार ढाकणे यांच्या बैठकीत 39 पैकी 17 कामगारांना कामावर नव्याने रुजु करण्याची तयारी ढाकणे यांनी दाखविली होती.यावेळी उर्वरित 22 कामगारांचा समावेशनाचा प्रश्न प्रलंबित असताना शेकाप नगरसेवक गुरुनाथ गायकर यांनी पुढाकार घेत ढाकणे यांच्यासोबत सविस्तर चर्चा केल्यांनतर या 22 कामगारांना देखील टोल नाक्यावर कामावर घेण्यास डि आर सर्व्हिसेसचे ढाकणे यांनी तयारी दर्शविल्याने शुक्रवार पासुन 22 कामगार कामावर रूजू झाले आहेत.मागील पाच महिन्यापासून घरी बसलेल्या या कामगारांवर लॉकडाऊनच्या काळात उपासमारीची वेळ आली होती.नव्याने कामावर रूजू केल्याने कामगार वर्गामध्ये आनंदाचे वातावरण आहे.नगरसेवक गुरुनाथ गायकर यांनी देखील यशस्वी तोडगा काढल्याने कामगारांनी त्यांचे आभार मानले आहेत.संबंधित  39 कामगारांना पीएफ आणि थकीत पगार मिळवुन देण्यासंदर्भात देखील माझा पाठपुरावा सुरु असल्याचे नगरसेवक गायकर यांनी सांगितले.सायन पनवेल महामार्गावरील खारघर व कामोठे याठिकाणी अवजड वाहनांकडून याठिकाणी टोल वसुली केली जाते.